Join us  

दिवाळीत गोड तर खायचे पण साखर नको ? घ्या साखरेला ४ पर्याय, करा गोड फराळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2023 3:12 PM

healthy sugar alternatives for diwali sweets : दिवाळी निमित्त गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी आपण साखरे ऐवजी या ४ पदार्थांचा नक्की वापर करू शकतो...

दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळी निमित्त सगळ्यांच्याच घरी फराळ, गोडधोड बनवण्याची लगबग सुरु असेलच. काहींचा तर एव्हाना फराळ बनवून झाला असेल, तर काहीजण फराळ बनवण्याच्या तयारीत असतील. फराळ हा प्रत्येकाच्याच घरी बनतो. दिवाळीनिमित्त फराळ हा आवर्जून बनवला जातो तसेच आवडीने खाल्ला देखील जातो. वर्षभरातून फराळ हा एकदाच अवश्य बनवून त्यावर ताव मारला जातो(healthy sugar alternatives for diwali sweets).

फराळ म्हटला की त्यातील काही पदार्थ हे गोड असतात. हे असे गोड पदार्थ व भरपेट फराळ खाल्ल्याने आपल्याला पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. फराळ म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया बनवताना आपण सगळेच शक्यतो गोड पदार्थ बनवण्यासाठी साखरेचा वापर करतो. लाडू, करंजी, शंकरपाळे असे फराळाचे पदार्थ बनवताना आपण त्यात भरपूर प्रमाणात साखरेचा वापर करतो. परंतु फराळाचे असे गोड पदार्थ किंवा साखर भरपूर प्रमाणात जर आपल्या शरीरात गेली तर त्याचा आपल्याला अपाय होऊ शकतो. याचबरोबर जास्त प्रमाणात साखर खाणे हे देखील आपल्या आरोग्याला हानिकारक ठरु शकते. यामुळे यंदाच्या दिवाळीत फराळ बनवताना आपण साखरे ऐवजी (4 tasty substitutes to diwali sweets) इतरही काही गोड पदार्थ वापरु शकतो. फराळ किंवा मिठाया बनवण्यासाठी जर आपण साखरे ऐवजी इतर हेल्दी किंवा पौष्टिक पदार्थांचा वापर केला तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरु शकते. फराळ बनवण्यासाठी आपण साखरे ऐवजी नेमक्या कोणत्या पदार्थांचा वापर करु शकतो ते पाहूयात(Replace Sugar with These Dried Fruits for Diwali Desserts).

साखरे ऐवजी नेमके कोणते पदार्थ वापरावेत ?

१. खजूर :- फराळ बनवण्यासाठी व पदार्थांना गोडपणा आणण्यासाठी आपण साखरे खजुराचा वापर करु शकतो. खजूरमध्ये आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात. खजूरामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, व प्रोटीन यांचे व्यतिरिक्त काही जीवनसत्वे आणि खनिजे असतात. निरोगी व चांगल्या आरोग्यासाठी खजुर खाण्याचे अनेक फायदे आहेत; खजुरात पोषक तत्वांचा खजिना आहे. खजूर कोणत्याही ऋतूमध्ये खाणं चांगल आहे; दररोज खजूर खाल्याने इम्युनिटी चांगली वाढते. रोगांपासुन बचाव होतो; आवडत असल्यास खजूर नुसतेही खाता येतात. खजूर दुधात घेतल्याने त्याची पोषक तत्व वाढतात. रात्री झोपताना खजूर खाल्याने; ख-या अर्थाने ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. 

दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...

२. अंजीर :- दिवाळी दरम्यान आपण अनेक प्रकारचे गोड पदार्थ बनवतो. या गोड पदार्थांमध्ये मिठाई हा प्रमुख पदार्थ असतो. मिठाईला गोडपणा येण्यासाठी आपण साखरेऐवजी अंजीराचा देखील वापर करु शकतो. अंजीरमध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. याशिवाय, त्यात व्हिटॅमिन ए, सी, ई, के, बी ६, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारखे आवश्यक पोषक घटक असतात. यामध्ये फायबर आणि साखर मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते. पचनास मदत करणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याबरोबरच अंजीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे दिवाळीत मिठाई बनवताना साखरे ऐवजी आपण अंजीराचा वापर करुन मिठाईला नैसर्गिक गोडवा आणू शकतो. 

चकली भाजणी करण्याचे हे घ्या परफेक्ट प्रमाण ! चकली चुकूनही बिघडणार नाही, फसणार नाही...

३. जर्दाळू :- जर्दाळूमध्ये पोटॅशियम, फायबर, बीटा कॅरोटीन, प्रथिने, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन के, ए आणि फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. हे हाडांसाठी फायदेशीर आहे. आपण मिठाई बनवताना त्याला गोडपणा येण्यासाठी जर्दाळूचा वापर करु शकतो. 

मार्केट सारखी खमंग, कुरकुरीत, मसाला शेव बनवण्याची सोपी रेसिपी, चव अशी की शेव होईल फस्त...

४. मनुका :- मिठाई बनवताना आपण त्याला गोडपणा आणण्यासाठी मनुक्याचा वापर करु शकतो. भिजवलेल्या मनुकांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने आपले वाढते वजन कमी करण्यासाठी मदत होते. त्यामुळे आपले वाढते वजन नियंत्रणास ठेवण्यास मदत होते. मनुकामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट पोषक घटकांचा समावेश असतो.

आता अनारसे फसणार नाहीत तर हसणार ! कुरकुरीत, जाळीदार, हलके - फुलके अनारसे होतील सहज सोपे...

टॅग्स :दिवाळी 2023अन्नदिवाळीतील पूजा विधीफिटनेस टिप्स