Lokmat Sakhi >Food > Republic Day Special : आज करा खास पदार्थ, तिरंगा ब्रेड पकोडा! साजरा करा आनंद..

Republic Day Special : आज करा खास पदार्थ, तिरंगा ब्रेड पकोडा! साजरा करा आनंद..

Republic Day Special Bread Pakoda Recipe रिपब्लिक डे निमित्त बनवा खास तिरंगा ब्रेड पकोडा, खमंग कुरकुरीत रेसिपी, बच्चे कंपनी होतील खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 08:16 PM2023-01-25T20:16:45+5:302023-01-25T20:17:46+5:30

Republic Day Special Bread Pakoda Recipe रिपब्लिक डे निमित्त बनवा खास तिरंगा ब्रेड पकोडा, खमंग कुरकुरीत रेसिपी, बच्चे कंपनी होतील खुश

Republic Day Special: Make special food today, tricolor bread pakoda! celebrate happiness.. | Republic Day Special : आज करा खास पदार्थ, तिरंगा ब्रेड पकोडा! साजरा करा आनंद..

Republic Day Special : आज करा खास पदार्थ, तिरंगा ब्रेड पकोडा! साजरा करा आनंद..

प्रजासत्ताक दिन सुरु होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन, दोन्ही दिवशी संपूर्ण देश देशभक्तीच्या रंगात रंगून जातो. अशा परिस्थितीत लोक हा दिवस खास बनवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काही जण दुकान आणि कार्यालय तिरंगा रंगाने सजवतात, तर काही तिरंगा रंगाचे कपडे आणि मेकअप करून तयार होतात.

आपला प्रजासत्ताक दिन घरच्या घरी साजरी होणार असेल तर, किचनमध्ये काहीतरी स्पेशल डिश बनवा. आपण या दिवशी तिरंगा ब्रेड पकोडा ही रेसिपी नाश्त्यासाठी बनवू शकता. ही रेसिपी महाराज जोधा राम चौधरी यांनी तयार केली आहे. हे शेफ राजास्थानमधील प्रसिद्ध शेफपैकी एक आहेत. ते खानदानी राजधानीमधील ऑथेंटिक डिशेस बनवण्यासाठी ओळखले जातात. चला तर मग या हटके पदार्थाची कृती पाहूयात.

तिरंगा ब्रेड पकोडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

100 ग्रॅम पनीर

पुदिन्याची चटणी

कोथिंबीर

लाल मिरचीची पेस्ट

टोमॅटो केचप

गरम मसाला

आमचूर पावडर

चवीनुसार मीठ

१ वाटी बेसन

ओवा

लाल मिरची पावडर

हिंग

बेकिंग सोडा

पाणी

चवीनुसार मीठ

ब्रेड

कृती

सर्वप्रथम, पनीरचे त्रिकोणी आकाराचे काप करा. दुसरीकडे एका बाऊलमध्ये बेसन, ओवा, लाल तिखट पावडर, गरम मसाला, हिंग, मीठ आणि पाणी टाकून मिश्रण मिक्स करा. त्यानंतर १ चमचा गरम तेल टाका आणि पुन्हा मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रणावर झाकण झाकून बाजूला ठेवून द्या.

आता ब्रेडचे त्रिकोणी काप करून घ्या, एका ब्रेड स्लाईजवर पुदिन्याची चटणी, लाल मिरचीची पेस्ट आणि दुसऱ्या स्लाईजवर टोमॅटो केचअप लावा. आता त्या ब्रेडवर पनीरचा एक त्रिकोणी भाग ठेवा. त्यावर दुसरा ब्रेड स्लाईज ठेवा. आता हलक्या हातांनी ब्रेडला प्रेस करा.

आता बेसनाच्या बॅटरमध्ये बेकिंग सोडा मिसळा. मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर त्यात ब्रेड दोन्ही बाजूने कोट करा. आता एका कढईत तेल गरम करत ठेवा त्यात कोटेट ब्रेड तळण्यासाठी हलक्या हातांनी सोडा, दोन्ही बाजूने सोनेरी रंग येऊपर्यंत चांगले खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे रिपब्लिक डे स्पेशल तिरंगा ब्रेड पकोडा सॉससोबत खाण्यासाठी रेडी.

 

Web Title: Republic Day Special: Make special food today, tricolor bread pakoda! celebrate happiness..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.