रोजच्या जेवणाला तेच तेच खाऊन कंटाळा आला की काय बनवावं सुचत नाही. डाळ, भात, पोळी, भाजी प्रत्येकजण खातो पण जेवायला काहीतरी वेगळं असावं असं नेहमी वाटतं. (Cooking Hacks & Tips) वारंवार हॉटेलमध्ये जाऊन खाणं शक्य होतंच असं नाही. हॉटेलमध्ये जेवण्याऐवजी तुम्ही घरच्याघरी हॉटेलच्या चवीचे चवदार पदार्थ बनवू शकता. यासाठी जास्त खर्चही करावा लागणार नाही. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही चवदार दाल खिचडी बनवू शकता. (How to make dal Khichdi)
दाल खिचडी चवीला उत्तम आणि खायलाही पौष्टीक आहे. यात वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो. मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण अधिक असते. एकाच पदार्थातून तुम्हाला फायबर्स आणि प्रोटीन्स दोन्ही मिळतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीसुद्धा हा उत्तम पदार्थ आहे. (Restaurant style dal khichdi recipe)
साहित्य
-१/२ कप तांदूळ
- १/२ कप तूर डाळ
- १/४ कप मूग डाळ
- १/४ कप मसूर डाळ
- १ चमचा तेल + १ चमचा तूप
- ३/४ टीस्पून मोहरी
- ३/४ टीस्पून जिरे
चिमूटभर हिंग
१० ते १२ कढीपत्ता पानं
- २ हिरव्या मिरच्या, चिरून
- १/२ टीस्पून आले, बारीक चिरून
- १/२ टीस्पून लसूण, बारीक चिरून
- १ आणि १/२ कांदे, बारीक चिरून
- २ टोमॅटो, बारीक चिरून
आवश्यकतेनुसार पाणी
कृती
सगळ्यात आधी एक वाटी तांदूळ, एक वाटी मसूर डाळ, एक वाटी तूर डाळ २ ते ३ तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्यानं हे मिश्रण धुवून घ्या. कुकरमध्ये तूप घालून त्यात एक चमचा मोहोरी, कढीपत्ता आणि मिरची, बारीक चिरलेले लसूण, चिरलेले कांदे, टोमॅटो, मीठ, हळद, लाल तिखट घालून एकत्र करा.
फोडणी तयार झाल्यानंतर त्यात भिजवलेले डाळ, तांदूळाचे मिश्रण घाला. गरजेनुसार पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा आणि कुकरचं झाकण बंद करा. कुकरचं झाकण उघडल्यानंतर त्यात चिरलेली कोथिंबीर घाला. वरून तूप घालून गरमागरम दाल-खिचडी पापड आणि लोणच्याबरोबर सर्व्ह करा.