Lokmat Sakhi >Food > ढाबास्टाईल चविष्ट दाल तडका १५ मिनिटांत घरीच करा, सोपी रेसिपी-पोट भरेल, मन भरणार नाही

ढाबास्टाईल चविष्ट दाल तडका १५ मिनिटांत घरीच करा, सोपी रेसिपी-पोट भरेल, मन भरणार नाही

Restaurant Style Dal Tadka Recipe (Dal tadka kasa banvaycha) : हॉटेलस्टाईल डाळ तडका घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीनं बनवू शकता. ही डाळ तुम्ही भात, चपाती कशाही बरोबर खाऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 01:38 AM2023-09-30T01:38:00+5:302023-10-01T00:54:30+5:30

Restaurant Style Dal Tadka Recipe (Dal tadka kasa banvaycha) : हॉटेलस्टाईल डाळ तडका घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीनं बनवू शकता. ही डाळ तुम्ही भात, चपाती कशाही बरोबर खाऊ शकता.

Restaurant Style Dal Tadka Recipe : Dhaba Style Dal Fry Recipe Easiest Way to Make Dal Tadka | ढाबास्टाईल चविष्ट दाल तडका १५ मिनिटांत घरीच करा, सोपी रेसिपी-पोट भरेल, मन भरणार नाही

ढाबास्टाईल चविष्ट दाल तडका १५ मिनिटांत घरीच करा, सोपी रेसिपी-पोट भरेल, मन भरणार नाही

रोजचं जेवण खाताना हॉटेलच्या जेवणाची आठवण प्रत्येकालाच येते.  हॉटेलचं जेवण खायला चविष्ट चवदार  लागतं तितकंच बनवायला कठीण असतं. (Dal tadka kasa banvaycha) साधं वरण भात असेल तरी घरची चव आणि हॉटेलची चव यात बराच फरक असतो. नेहमी त्याच चवीचा वरण भात खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. (Restaurant Style Dal Tadka Recipe) तुमच्याही बाबतीत असं होत असले तर तुम्ही हॉटेलस्टाईल डाळ तडका घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीनं बनवू शकता. ही डाळ तुम्ही भात, चपाती कशाही बरोबर खाऊ शकता. (Dal Takda Recipe)

हॉटेल्स्टाईल डाळ तडका घरी कसे बनवायचे? (How to make hotel Style dal takda) 

1) रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडका बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ एकत्र करून २ ते ३ वेळा धुवून घ्या. डाळ धुतल्यानंतर डाळ व्यवस्थित बुडेल इतकं पाणी घालून १५ ते २० मिनिटांसाठी भिजवायला ठेवा. डाळीत २ मिरच्या,  हळद, हिंग घालून डाळ शिजवून घ्या. त्यानंतर डाळ घोटून घ्या.

2) कढईत तेल घालून त्यात जीरं, लसूण, आलं व्यवस्थित परतून घ्या. त्यात कांदाही घालून परतवून घ्या. कांदा परतवून घेतल्यानंतर त्यात गरम मसाला, लाल तिखट, हळद, टोमॅटो, मीठ घाला. टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात डाळ घाला.

3) डाळीला उकळी फुटल्यानंतर त्यात अर्धा चमचा गरम मसाला घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी घाला आणि डाळ शिजू द्या.

4) फोडणीसाठी एका भांड्यात तूप घेऊन त्यात लसूण घाला. लसणात लाल मिरच्या, लाल तिखट घाला. चमच्याने हे साहित्य एकत्र करून गरमगरम फोडणी डाळीच्या भांड्यात घाला.

डाळ तांदूळ न वाटता-न आंबवता १० मिनिटांत करा पौष्टीक डोसा; सोपी रेसिपी-झटपट नाश्ता

5) चमच्याच्या साहाय्याने डाळ व्यवस्थित फोडणीसह एकजीव करून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून दाल तडका भाताबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व्ह करा.

6) ताड तडका बनवण्यासाठी डाळी आधी भिजवायला विसरू नका. डाळी भिजवल्यामुळे लवकर शिजण्यास मदत होते. तुम्ही यात आवडीनुसार आमसूल पावडर, धणे पावडर, पावभाजी मसाल किंवा सांबार मसाला घालू शकता.

इडलीचं पीठ भरपूर फुलेल; डाळ-तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ घाला; मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

7) डाळी तडका परफेक्ट बनवण्यासाठी तुम्ही फोडणी कशी देता हे सुद्धा फार महत्वाचं असतं. फोडणीचे पदार्थ जळले तर चव बिघडते. म्हणून  तेल गरम झाल्यानंतर गॅसची आच मंद करा आणि त्यात एक-एक पदार्थ घाला. 
 

Web Title: Restaurant Style Dal Tadka Recipe : Dhaba Style Dal Fry Recipe Easiest Way to Make Dal Tadka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.