Join us  

Restaurant Style Jeera Rice : हॉटेलस्टाईल जीरा राईस घरच्याघरी करा; भात होईल मोकळा, रुचकर, ही घ्या रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 9:04 PM

Restaurant Style Jeera Rice : जीरा राईस बनवण्याची सोपी पद्धत या व्हिडिओत पाहूया. (How to make jeera rice at home)

रोज रोज वरण भात, खिचडी खाल्यानंतर बिर्याणी किंवा पुलाव खायची इच्छा होते. कारण जेवणात तेव्हढाच चेंज मिळतो.  ग्रेव्हीसोबत जीरा राईस खाण्याची मजाच काही वेगळी. जीरा राईस करायला सोपा असला तरी घरी बनवताना तो हॉटेलसारखा परफेक्ट बनत नाही. जीरा राईस बनवण्याची सोपी पद्धत या व्हिडिओत पाहूया. (How to make jeera rice at home)

साहित्य

2 कप तांदुळ

१ कप पाणी

२ चमचे साजूक तूप

अर्धा टिस्पून जिरं

८ ते १० काळीमिरी

५ ते ६ लवंग

२ दालचिनी

मीठ चवीनुसार

तेल

कृती

१) सगळ्यात आधी तांदूळ धुवा आणि पंधरा ते वीस मिनिटं भिजवा नंतर पाणी गाळून घ्या.

२) कुकरमध्ये तूप गरम करा. त्यात  जीरं, खडा घालून फोडणी तयार करा.

३) फोडणी तडतडल्यावर त्यात तांदूळ घालून परतून घ्या आणि थोडं मीठ घाला.  त्यानंतर १ कप पाणी घालून उकळी  येऊ द्या.

४) पाण्याला उकळी आल्यानंतर झाकण लावा आणि दोन शिट्ट्या घेऊन गॅस बंद करा. जास्त शिट्ट्या घेऊ नका अन्यथा भात गचगचीत होईल. 

५)  भात सुटसुटीत राहण्यासाठी  दोनच शिट्ट्या घ्या.  थोड्या वेळानं कुकर उघडा तयार आहे गरमा गरम भात.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स