Lokmat Sakhi >Food > डोशाचं पीठ फुगतच नाही? डाळ-तांदूळ वाटताना करा १ युक्ती, विकतासारखे सॉफ्ट-जाळीदार होतील डोसे

डोशाचं पीठ फुगतच नाही? डाळ-तांदूळ वाटताना करा १ युक्ती, विकतासारखे सॉफ्ट-जाळीदार होतील डोसे

Restaurant Style Masala Dosa Making Tips : डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे अगदी कमीत कमी असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 04:10 PM2024-02-28T16:10:55+5:302024-02-28T16:36:10+5:30

Restaurant Style Masala Dosa Making Tips : डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे अगदी कमीत कमी असते.

Restaurant Style Masala Dosa Making Tips : How to Cook The Perfect Dosa Restaurant Style Plain Dosa Recipe | डोशाचं पीठ फुगतच नाही? डाळ-तांदूळ वाटताना करा १ युक्ती, विकतासारखे सॉफ्ट-जाळीदार होतील डोसे

डोशाचं पीठ फुगतच नाही? डाळ-तांदूळ वाटताना करा १ युक्ती, विकतासारखे सॉफ्ट-जाळीदार होतील डोसे

सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला इडली, डोसा हे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. डोसा घरी केला तर विकत सारखा होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. (Cooking Hacks) घरी डोसा बनवायचा म्हणलं की डोश्याचे बॅटर फुलत नाही किंवा डोसा खूपच बेचव बनतो. असं होऊ नये म्हणून तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे अगदी कमीत कमी असते. (How to Make Dosa at Home) फार खर्च न करता घरच्याघरी तुम्ही डोसा बनवू शकता. 

डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य (How To Make Dosa At Home)

१) तांदूळ- ३ कप

२) उडिदाची डाळ- १ कप

३) मेथीचे दाणे- १ टेबलस्पून

४) शुगर- १ टिस्पून

डोसा कसा तयार करायचा? (Dosa Batter Making Tips)

१) घरच्याघरी डोसे बनवण्यासाठी सगळ्यात आधी  एका भांड्यात ३ कप तांदूळ,  १ कप उडीदाची डाळ, १ टेबलस्पून मेथी घ्या.  हे सर्व साहित्य पाण्यात भिजेल इतकं पाणी घालून त्यावर झाकण ठेवून द्या.

हाडांना भरपूर फॉस्फोरस देणारे 5 पदार्थ खा; कॅल्शियमही मिळेल-पोलादी शरीर, हाडं मजबूत होतील

२) जवळपास ३ ते ४ तास हे साहित्य पाण्यात भिजू द्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण घालून बारीक पेस्ट होईपर्यंत दळून द्या. पीठ जास्त पातळ किंवा घट्ट नसेल याची खात्री करा. इडलीच्या पिठाच्या कंसिस्टंसीप्रमाणेच पेस्ट करून घ्या. त्यात १ ते २ चमचे साखर घालून ८ ते ९ तासांसाठी झाकून ठेवा. 

३) झाकण्यासाठी तुम्ही प्लास्टीकच्या पेपरचा वापर करू शकता. जेणेकरून हिट चांगली मेंटेन राहील आणि पीठ व्यवस्थित फुलून येईल. 

रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

४) ८ ते ९ तास पीठ आंबवण्यासाठी ठेवल्यानंतर त्यावरचा प्लास्टिक पेपर काढून घ्या आणि हे पीठ चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्या. (How to Cook The Perfect Dosa Restaurant Style Plain Dosa Recipe) एका छोट्या भांड्यात पीठ काढून घ्या. त्यात गरजेनुसार पाणी आणि मीठ घालून चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण ढवळून घ्या.

५) ढवळल्यानंतर चमच्याने लागेल तेव्हढं पीठ घेऊन तव्यावर घालून डोसे काढून घ्या. या पद्धतीने डोसा बनवल्यास डोसा अजिबात बिघडणार नाही. डोसा एकदम  मऊ आणि लुसलुशित होईल. 

Web Title: Restaurant Style Masala Dosa Making Tips : How to Cook The Perfect Dosa Restaurant Style Plain Dosa Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.