जेवणात तोंडी लावायला कांदा असला की जेवणाची रंगत आणखी वाढते. आपण बऱ्याचदा जेवणात तोंडी लावायला कांद्याच्या उभ्या किंवा गोल गोल फोडी करतो. त्या फोडींना फार फार तर लिंबू- मीठ लावतो. ते ही चवदार लागतेच. पण कांद्याला आणखी वेगळा स्वाद आणण्यासाठी या बघा काही सोप्या रेसिपी (Restaurant style onion salad recipe). यामध्ये कांद्याला चव तर छान येईलच पण त्याचं रंग- रुपही बदलेल. असा मस्त सजवलेला कांदा जेवणाच्या टेबलवर आलाच, तर खाणारेही अगदी खूश होऊन जातील.(How to make hotel style onion salad)
ओनियन सलाड रेसिपी
या सगळ्या रेसिपी इन्स्टाग्रामच्या cooking_niti या पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत. यातील प्रत्येक रेसिपीसाठी करण्याची पुर्वतयारी म्हणजे कांदा हॉटेलमध्ये देतात, तसा गोलाकार कापून घ्या.
१. मसाला कांदा
हा कांदा करण्यासाठी एका भांड्यात एक वाटी थंड पाणी घ्या. त्यात अर्धा कप व्हिनेगर टाका.
स्टार किड्स आणि त्यांची महागडी फॅशन! बघा कोणत्या स्टार्सची मुलं वापरतात सर्वाधिक महागड्या वस्तू
त्यात पाच ते सहा लवंग, दालचिनीचा छोटासा तुकडा, दोन पेज पत्ता आणि एक टेबलस्पून किसलेलं बीट टाका. या पाण्यात कांदा १० ते १२ मिनिटे भिजू द्या. त्यानंतर काढून घ्या आणि सर्व्ह करा.
२. दही पुदिना फ्लेवर
यासाठी पुदिन्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या. पुदिन्याची पेस्ट जेवढी असेल तेवढेच त्यात दही टाका.
खाल्लंय कधी कांद्याचं लोणचं? चटकदार कांदा- मिरची लोणच्याची ही बघा चटपटीत रेसिपी
थोडा चाट मसाला आणि थोडं मीठ टाका. आता या मिश्रणामध्ये कांदा भिजत घाला. नंतर १० ते १२ मिनिटांनी कांदा मिश्रणातून काढून घ्या. आणि सर्व्ह करा.
३. लिंबू मसाला कांदा
एका वाटीत एक टेबलस्पून तिखट, एक टेबलस्पून गरम मसाला, एक टेबलस्पून चाट मसाला आणि २ ते ३ टेबलस्पून लिंबाचा रस घाला.
ओठ काळवंडले आणि भेगाही पडल्या २ उपाय, भेगा गायब आणि ओठ होतील मऊ- गुलाबी
आता या मसाल्यात कांद्याच्या फोडी टाका. सगळ्या फोडींना कांदा व्यवस्थित लागेल असं बघा. आता हा कांदा जेवणात तोंडी लावायला छान लागेल.