Join us  

नव्या पद्धतीनं करा सोयाबीनची चमचमीत भाजी; ‘असा’ करा मसाला, सोपी रेसिपी- चवीला भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 2:02 PM

Restaurant style soya chunks curry : रोज रोज पालेभाज्या, फळभाज्या खाऊन कंटाळा आला की पनीर,मशरूम, सोयाबीन खाल्ल्यास तेव्हढाच बदल मिळतो.

सोयाबीन हा प्रोटीन्सचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. आहारतज्ज्ञही जेवणात सोयाबीनचा समावेश करण्याचा सल्ला आवर्जून देतात. (Cooking Hacks & Cooking Tips) जे लोक शाकाहारी पदार्थांचा आहारात समावेश करतात त्यांच्यासाठी सोयाबीन म्हणजे पोषक तत्वांचा खजिनाच आहे. सध्या अधिक महिना सुरू आहे आणि श्रावण सुरू होणार आहे. (Soyabin Gravy) त्यामुळे अनेक मांसाहार करणाऱ्यांनी  शाकाहार करायला सुरूवात केली आहे (Cooking Hacks & Tips)

रोज रोज पालेभाज्या, फळभाज्या खाऊन कंटाळा आला की पनीर,मशरूम, सोयाबीन खाल्ल्यास तेव्हढाच बदल मिळतो. हॉटेलस्टाईल सोयाबीनची ग्रेव्ही बनवणं सर्वांनाच जमतंच असं नाही. सोयाबीनची भाजी बनवण्याची योग्य पद्धत आणि मसाले कोणते वापरायचे याची कल्पना असेल तर भाजी चव दुप्पटीनं वाढेल. (How to make soyabin ki bhaji) दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठीही तुम्हीही भाजी बनवू शकता. 

साहित्य

२ - कप सोया संक्स

२ - उकडलेले बटाटे

१/२ कप- मटार

१/२ कप - दही

१ इंच बारीक चिरलेला - आल्याचा तुकडा

४-५ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर

२-३ बारीक चिरलेली हिरवी मिरची

चिमुटभर हिंग

अर्धा चमचा जीरं

अर्धा चमचा धणे पावडर

अर्धा चमचा हळद पावडर

अर्धा चमचा लाल मिरची पावडर

एक चमचा कश्मिरी लाल मिरची

अर्धा चमचा गरम मसाला

अर्धा चमाच चाट मसाला

चवीनुसार मीठ

२ चमचे तेल

कृती

सगळ्यात आधी बटाटे उकडून सालं काढून घ्या. नंतर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यात सोया चंक्स उकळून घ्या मग गाळून घ्या. एका मोठ्या भांड्यात एक वाटी दही घ्या त्यात सर्व मसाले, धणे पावर, जीरे पावडर, हळद, लाल मिरची पावडर घालून एकजीव करा.

आता एका कढई गॅसवर ठेवा. त्यात तेल घालून जीरं, हिंग, मिरची घालून तळून घ्या.  आता त्यात दही आणि दह्यात घातलेला मसाल घाला. गॅस मंद आचेवर ठेवा. मसाले फ्राय केल्यानंतर त्यात कच्चे मटार, सोया चंक्स घालून भाजून घ्या. मसाले जळू नयेत यासाठी त्यात थोडं पाणी घाला. त्यात उकडलेले बटाट्यांचे बारीक काप करून घाला.

बटाटे आणि सोयाबीन व्यवस्थित मिसळा.  त्यात एक ग्लास पाणी घाला आणि कढईवर झाकण ठेवून गॅस मंद आचेवर असू द्या. ४ ते ५ मिनिटांनी झाकण काढून त्यात गरजेनुसार पाणी घाला. त्यात मीठ घालून ३ ते ४ मिनिटांसाठी गॅसवर तसेच ठेवा. मग भाजी शिजल्यावर गॅस बंद करा.

झाकण काढून त्यात चुटकीभर गरम मसाला, बडीशेप पावडर भाजीवर घाला. तुम्ही आवडीनुसार सुकी भाजी सुद्धा बनवू शकता.  यानुसार पाणी कमी-जास्त घालू शकता. बारीक कापलेल्या कोथिंबीरीने भाजी सजवा मग गॅस बंद करा.  एका सर्विंग पॉटमध्ये भाजी काढा आणि गरमागरम चपाती, भात किंवा पुऱ्यांसह ही भाजी खाऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स