Lokmat Sakhi >Food > Rice Adulteration FSSAI Tips : तुम्हीसुद्धा तांदूळ समजून दगडं खाताय का? FSSAI नं सांगितली बनावट तांदूळ ओळखण्याची ट्रिक

Rice Adulteration FSSAI Tips : तुम्हीसुद्धा तांदूळ समजून दगडं खाताय का? FSSAI नं सांगितली बनावट तांदूळ ओळखण्याची ट्रिक

Rice Adulteration FSSAI Tips : FSSAI ने आतापर्यंत अनेक खाद्यपदार्थांची चाचणी करण्याची पद्धत ट्विटरवर शेअर केली आहे. खाद्यपदार्थांमधील भेसळीची माहिती देण्यासाठी FSSAI ने अनोखी मोहीम सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 11:43 AM2021-12-16T11:43:05+5:302021-12-16T11:46:55+5:30

Rice Adulteration FSSAI Tips : FSSAI ने आतापर्यंत अनेक खाद्यपदार्थांची चाचणी करण्याची पद्धत ट्विटरवर शेअर केली आहे. खाद्यपदार्थांमधील भेसळीची माहिती देण्यासाठी FSSAI ने अनोखी मोहीम सुरू केली आहे.

Rice Adulteration FSSAI Tips : Simple test to find out if sella rice is adulterated take a look | Rice Adulteration FSSAI Tips : तुम्हीसुद्धा तांदूळ समजून दगडं खाताय का? FSSAI नं सांगितली बनावट तांदूळ ओळखण्याची ट्रिक

Rice Adulteration FSSAI Tips : तुम्हीसुद्धा तांदूळ समजून दगडं खाताय का? FSSAI नं सांगितली बनावट तांदूळ ओळखण्याची ट्रिक

आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या जर काही असेल तर ती म्हणजे अन्नपदार्थातील भेसळ. निरोगी राहण्यासाठी ज्या गोष्टी आपण रोजच्या आहारात वापरतो त्या आपल्यासाठी हानिकारकही ठरतात आणि त्याचे कारण भेसळ आहे. अशा स्थितीत, स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी केवळ योग्य घटकांचा वापर करणे खूप महत्वाचे आहे. पण भेसळयुक्त गोष्टी तपासायच्या कशा असा प्रश्न पडतो.

या प्रश्नाचे उत्तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) देत आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने आतापर्यंत अनेक खाद्यपदार्थांमधील भेसळ तपासण्याचा सोपा मार्ग सुचवला आहे. आता अलीकडेच FSSAI ने आपल्या ट्विटरवर अशीच एक माहिती शेअर केली आहे. ज्याद्वारे सेला तांदळाची शुद्धता जाणून घेता येते. भेसळ तपासण्याच्या या पद्धतीबद्दल जाणून घेऊया.

 FSSAI ने आतापर्यंत अनेक खाद्यपदार्थांची चाचणी करण्याची पद्धत ट्विटरवर शेअर केली आहे. खाद्यपदार्थांमधील भेसळीची माहिती देण्यासाठी FSSAI ने अनोखी मोहीम सुरू केली आहे. FSSAI ने त्याला #DectingFoodAdulterants असे नाव दिले आहे. याआधी हळद वगैरे तपासण्याची पद्धतही शेअर केली आहे. त्याचबरोबर ही मोहीम पुढे नेत यावेळी सेला राईसमधील भेसळ तपासण्याची प्रक्रियाही शेअर केली आहे.

कसा तयार होतो सेल्ला राईस

सेला तांदूळ जगभर खाल्ले जातात. विशेषत: भारताच्या पूर्व आणि दक्षिण भागात हा तांदूळ भरपूर वापरला जातो. सेला तांदूळ प्रक्रिया करण्यापूर्वी, ते वाफवले जाते आणि गिरणीत पाठवण्यापूर्वी वाळवले जाते. जेणेकरुन त्याची गुणवत्ता टिकून राहते आणि त्यातील पोषक तत्वे देखील अबाधित राहतील. या प्रक्रियेद्वारे सेला तांदूळ घेण्यामागे एकच उद्देश आहे जेणेकरून तांदूळ शिजल्यानंतरही हा दर्जा टिकून ठेवता येईल.

तांदळातली भेसळ कशी ओळखाल?

सेला तांदळात हळदीची भेसळ आहे की नाही हे तपासण्याची पद्धत FSSAI ने सांगितली आहे. FSSAI ने त्याला 'Detect Turmeric Adulteration in Sella Rice' असे नाव दिले आहे. FSSAI ने त्याची चाचणी घेण्याची सोपी पद्धत देखील शेअर केली आहे, जी खालीलप्रमाणे आहे.

1) सर्व प्रथम, एक काचेची डीश घ्या. त्यात थोडा सेला भात घाला.

2) यानंतर या भातावर भिजवलेला चुना टाकावा.

3) जर तुमचा भात शुद्ध असेल तर चुन्याचा रंग तसाच राहील.

4)  जर चुन्याचा रंग लाल झाला तर याचा अर्थ तुमच्या तांदळात भेसळ आहे.
 

Web Title: Rice Adulteration FSSAI Tips : Simple test to find out if sella rice is adulterated take a look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.