Lokmat Sakhi >Food > १ वाटी डाळ-तांदूळाचा करा विकतसारखा जाळीदार ढोकळा; जीभेवर ठेवताच विरघळेल-सोपी रेसिपी

१ वाटी डाळ-तांदूळाचा करा विकतसारखा जाळीदार ढोकळा; जीभेवर ठेवताच विरघळेल-सोपी रेसिपी

Rice And Chana Dal Dhokla Recipe : (Dhokla kasa banvaycha te dakhva) फक्त २ पदार्थ वापरून तुम्ही मार्केटसारखा मऊसूत, जीभेवर ठेवताच विरघळेल असा ढोकळा बनवू शकता.  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:35 PM2023-11-10T12:35:00+5:302023-11-11T00:15:38+5:30

Rice And Chana Dal Dhokla Recipe : (Dhokla kasa banvaycha te dakhva) फक्त २ पदार्थ वापरून तुम्ही मार्केटसारखा मऊसूत, जीभेवर ठेवताच विरघळेल असा ढोकळा बनवू शकता.  

Rice And Chana Dal Dhokla Recipe : Dhokla Karnyachi Recipe in Marathi Instant Chana Dal Dhokla Recipe | १ वाटी डाळ-तांदूळाचा करा विकतसारखा जाळीदार ढोकळा; जीभेवर ठेवताच विरघळेल-सोपी रेसिपी

१ वाटी डाळ-तांदूळाचा करा विकतसारखा जाळीदार ढोकळा; जीभेवर ठेवताच विरघळेल-सोपी रेसिपी

सकाळी नाश्त्यासाठी नेहमी काय नवीन करावं असा प्रश्न प्रत्येक घरातील महिलांना पडतो. (Cooking Hacks) नाश्त्याला चपाती, भाकरीसारखे हेवी पदार्थ खाणंही अनेकांना आवडत नाही. (Dhokla kasa banvaycha) अशावेळी तुम्ही हलका-फुलका नाश्ता म्हणून खमन ढोकळा (Khaman Dhokla) ट्राय करू शकता. चण्याची डाळ आणि तांदूळ प्रत्येकाच्यात घरी असतात. (Dhokla recipe with eno in cooker) फक्त हे २ पदार्थ वापरून तुम्ही मार्केटसारखा मऊसूत, जीभेवर ठेवताच विरघळेल असा ढोकळा बनवू शकता.  हा ढोकळा बनवणं खूपच सोपं आहे. ढोकळा करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Instant  Dhokla Recipe)

 डाळ- तांदूळाचा ढोकळा कसा करावा? (Khaman Dhokla Recipe/Dhokla with chana dal and rice)

१) डाळ- तांदळाचा ढोकळा  करण्यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये अर्धा कप स्वच्छ धुवून घेतेला तांदूळ आणि अर्धा कप तुरीची स्वच्छ धुवून घेतलेली डाळ २ तासांसाठी भिजवण्यासाठी ठेवा.  तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर त्यातलं पाणी उपसून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात ३ चमच दही घाला. 

खुसखुशीत खारे शंकरपाळे झटपट घरीच करा; सोपी रेसिपी, कमी तेलात-खमंग होतील शंकरपाळे

२) थोडं पाणी मिसळून या मिश्रणाची  बारीक पेस्ट बनवून घ्या. दही नसेल तर तुम्ही ताकाचाही वापर करू शकता. मिक्सरमधून बारीक पेस्ट काढल्यानंतर त्याच चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि बेकींग सोडा घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. यात तुम्ही बेकींग सोड्याऐवजी इनोसुद्धा मिसळू शकता. 

३) एका कुकरच्या भांड्याला किंवा कढईत मावेल अशा पसरट भांड्याला तेल लावून कोटींग करून घ्या. या भांड्यात ढोकळ्याचे मिश्रण घालून डबा व्यवस्थित हलवून घ्या म्हणजे बॅटर सेट होईल. हे भांडं इडलीच्या कुकरमध्ये किंवा कढईत ठेवून १० ते १५ मिनिटांसाठी वाफवून घ्या मग गॅस बंद करा. 

पोह्याचा चिवडा ना मऊ पडणार, ना आकसणार; चटकदार पातळ पोहा चिवड्याची सोपी रेसिपी

४) फोडणीसाठी एका फोडणी पात्रात तेल घाला. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात मोहोरी, मिरची, कढीपत्ता, हिंग घाला मग त्यात ४ ते ५ टिस्पून पाणी घाला आणि साखर घालून ढवळून घ्या.

5) ढोकळ्याचे बॅटर छान वाफवून घेतल्यानंतर एका ताटात काढून त्याचे चौकोनी काप करा आणि त्यावर फोडणीचे पाणी घाला. तयार आहे चटपटीत ढोकळा. हा ढोकळा तुम्ही अगदी कमी वेळात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवू शकता.

Web Title: Rice And Chana Dal Dhokla Recipe : Dhokla Karnyachi Recipe in Marathi Instant Chana Dal Dhokla Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.