Join us  

वाटीभर डाळ-तांदूळ घ्या, करा सॉफ्ट-जाळीदार ढोकळा; मार्केटसारखा परफेक्ट ढोकळा बनेल घरीच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:07 AM

Rice and Chana Dal Dhokla Recipe (Dhokla kasa banvaycha te dakhva) : घरी केलेला ढोकळा फुलत नाही, आंबट होत नाही, खाताना घश्यात अडकतो अशी अनेकांची तक्रार असते. 

नाश्त्याला नेहमी पोहे, चहा-चपाती, इडली खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी जास्तवेळ न घालवता तुम्ही सोप्या पद्धतीने डाळ तांदूळाचा ढोकळा बनवू शकता. (Cooking Hacks) हा ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला बेसन पीठाची आवश्यकता नसेल.  डाळ-तांदूळाचा ढोकळा घरच्याघरी कधीही करू शकता. (How to make Dhokla at Home)  घरी केलेला ढोकळा फुलत नाही, आंबट होत नाही, खाताना घश्यात अडकतो अशी अनेकांची तक्रार असते. हे टाळण्यासाठी ढोकळा करण्याची परफेक्ट पद्धत पाहूया. (Easy Dhokla Recipe)

डाळ तांदूळाचा मऊ ढोकळा कसा करायचा हे पाहूया? (Rice and Chana Dal Dhokla Recipe)

१) ढोकळा बनवण्यासाठी तांदूळ एका बाऊलमध्ये २ वाटी तांदूळ घ्या. तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता. रेशनचा किंवा बासमती, तुकडा तांदूळ घेऊ शकता.  २ वाटी तांदळासाठी १ वाटी हरभऱ्याची डाळ घ्या. हे अगदी योग्य प्रमाण आहे. डाळ  आणि तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. 

२) ६  ते ७ तास डाळ-तांदूळ भिजवल्यानंतर पाणी उपसून मिक्सरमध्ये घाला. यात एक वाटी आंबट दही घालून बारीक वाटून घ्या. यात गरजेनुसार १ ते २ चमचे पाणी घालून वाटून घ्या. १० ते १२ तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण व्यवस्थित फर्मेंट झालेलं दिसेल. हे पीठ फार फुगलेलं दिसणार नाही हलके बुडबुडे दिसतील. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून घ्या. 

१ वाटी तांदूळाचा करा सॉफ्ट-स्पॉन्जी पांढरा ढोकळा; 5 मिनिटांत बनेल ढोकळा अगदी मार्केटसारखा

३)  या मिश्रणात चवीपुरता मीठ, २ ते ३ चिमूट हळद घालून एकजीव करून घ्या. हळद सगळीकडे व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या. हळद जास्त घालू नका अन्यथा ढोकळा लालसर दिसतो.  २ मिनिटं व्यवस्थित फेटून घ्या. एका ताटाला किंवा कुकरच्या पसरट डब्याला तेल लावून त्यात ढोकळ्याचे बॅटर घाला.

४) एका कढईमध्ये आधी पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळ्यानंतर त्यावर स्टॅण्ड ठेवून त्यावर ढोकळ्याचे बॅटर  घातलेलं ताट  ठेवा.  ढोकळ्याचे पीठ ताटात घालण्याआधी त्यात २ चमचे तेल घाला. तेल घातल्यामुळे ढोकळा घश्यात अडकत नाही. यात १ चिमूट खाण्याचा सोडा घाला. ताट व्यवस्थित टॅप करून मध्यम आचेवर   १५ मिनिटांसाठी शिजवून घ्या. ढोकळा मस्त फुललेला दिसून येईल. ढोकळा थंड करून त्याचे चौकोनी काप करा. 

१ कच्चा बटाटा घ्या ५ मिनिटांत करा क्रिस्पी डोसा; बटाटा डोशाची सोपी रेसिपी-झटपट बनेल नाश्ता

५) फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात  मोहोरी, कढीपत्ता, मिरची, हिंग, पाणी आणि साखर घालून एक फोडणी तयार करा. तयार फोडणी ढोकळ्याच्या तुकड्यांवर घाला. या पद्धतीने ढोकळा केल्यास अगदी स्पॉन्जी आणि फुललेला बनतो. 

टॅग्स :पाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स