Join us  

डाळ - तांदूळ भिजत न घालता आप्पे करायचेत? कपभर उरलेला भात घ्या - १० मिनिटात गुबगुबीत आप्पे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2024 5:48 PM

Rice Appe Recipe | Leftover Rice Recipes | Healthy Breakfast : १० मिनिटात चविष्ट नाश्ता करायचा असेल तर, उरलेल्या भाताचे चविष्ट आप्पे करून पाहा

रोज सकाळी उठून ब्रेकफास्टला काय करावं सुचत नाही? रोजचे पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ किंवा भाजी - पोळी खाऊन कंटाळा येतो (Healthy Breakfast). साऊथ इंडियन पदार्थ अनेकांना आवडतात (Food). इडली, डोसा, आप्पे, मेदू वडे हे पदार्थ चवीला जबरदस्त आणि पौष्टीक असतात (Cooking Tips). ज्यात आप्पे हा पदार्थ आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. पण आप्पे करण्यासाठी डाळ - तांदूळ भिजत घालावे लागते.

जर घरात भात उरला असेल आणि आपल्याला फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर, उरलेल्या भाताचे आप्पे करून पाहा. चटपटीत पौष्टीक आप्पे अगदी काही मिनिटात तयार होईल. शिवाय हा पदार्थ आपण मुलांना टिफिनसाठीही देऊ शकता(Rice Appe Recipe | Leftover Rice Recipes | Healthy Breakfast).

उरलेल्या भाताचे आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य

उरलेला भात

कांदा

सिमला मिरची

शेझवान सॉस

साबुदाणा वडे तेल फार पितात - तळताना फुटतात? १ ट्रिक - वडे होतील परफेक्ट, प्रमाण चुकणार नाही..

मीठ

तेल

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी उरलेला भात त्यात थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. उरलेल्या भाताची पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, एक शेझवान सॉस, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आपण त्यात आपल्या  आवडीनुसार भाज्याही घालू शकता.

पावसाळ्यात चमचमीत गरमगरम वरण खावेसे वाटते? करा पंचरत्न डाळ; ५ डाळींचा खास मेळ

नंतर आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर ब्रशने तेल लावा. आप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्यात चमचाभर बॅटर घाला. आप्पे पात्राला झाकण लावा. नंतर दोन्ही बाजूने आप्पे खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत पौष्टीक आप्पे खाण्यासाठी रेडी. आपण हे आप्पे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स