Lokmat Sakhi >Food > तांदुळाची कुरडई खाल्ली आहे कधी? यंदा करून पाहा पांढरीशुभ्र तांदूळ कुरडई, सोपी रेसिपी

तांदुळाची कुरडई खाल्ली आहे कधी? यंदा करून पाहा पांढरीशुभ्र तांदूळ कुरडई, सोपी रेसिपी

Summer Special : Rice Instant Kurdai तांदळाचं वापर करून बनवा इन्स्टंट कुरडई, कमी साहित्यात झट की पट रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 02:08 PM2023-03-15T14:08:42+5:302023-03-15T14:09:44+5:30

Summer Special : Rice Instant Kurdai तांदळाचं वापर करून बनवा इन्स्टंट कुरडई, कमी साहित्यात झट की पट रेसिपी..

Rice Kachri, chawal ke phool, Tandalachi Kurdai Recipe | तांदुळाची कुरडई खाल्ली आहे कधी? यंदा करून पाहा पांढरीशुभ्र तांदूळ कुरडई, सोपी रेसिपी

तांदुळाची कुरडई खाल्ली आहे कधी? यंदा करून पाहा पांढरीशुभ्र तांदूळ कुरडई, सोपी रेसिपी

उन्हाळा सुरु झाला की, महाराष्ट्रातील महिलांची वर्षभराचे वाळवण करायची लगभग सुरु होते. त्यात पापड, कुरडई, साबुदाणा चकली, सांडगे, अशा नानाविध प्रकार बनवले जातात. कुरडई हा प्रकार लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतो. कुरडई तळल्यानंतर चौपटीने फुलते. चवीला देखील उत्कृष्ट लागते. कुरडई गव्हाचा वापर करून बनवले जाते. मात्र, हे कुरडई बनवण्यासाठी खूप वेळ जातो. गव्हाला भिजवून, त्याचा चिक काढून हा पदार्थ बनवला जातो.

आपल्याला जर झटपट पद्धतीने कुरडई बनवायची असेल, तर आपण तांदळाचा वापर करून कुरडई बनवू शकता. तांदळाचे कुरडई बनवायला सोपे आहे व हा पदार्थ कमी साहित्यात बनतो. आपण हे कुरडई बनवून डब्यात साठवून देखील ठेऊ शकता. जेणेकरून हे वर्षभर टिकतील(Summer Special : Rice Instant Kurdai).

तांदळाचे कुरडई बनवण्यासाठी लागणारं साहित्य

२ कप तांदळाचे पीठ

२ कप पाणी

१ टेबलस्पून मीठ

२ टेबलस्पून तेल

पापड खार

रंग आपल्या आवडीनुसार

तीन डाळींचे सांडगे करण्याची पाहा पारंपारिक पद्धत, करायला सोपे आणि पौष्टिक

तांदळाचे कुरडई बनवण्याची कृती

राजस्थानी खिचिया पापड करण्याची पाहा कृती, फक्त २ कप तांदुळात करुन पाहा मस्त फुलणारे पापड

प्रथम, एका भांड्यात तांदूळ धुवून घ्या, त्यानंतर त्यात पाणी घालून ३ दिवस भिजत ठेवा. दररोज पाणी बदलत राहा. तिसऱ्या दिवशी पाणी काढून थोडे सुकवून बारीक दळून घ्या.

कमी साहित्यात ५ मिनिटात तयार होते बिटाचे लालचुटूक रायते, उन्हाळ्यात जेवताना हवेच

आता एक जाड भांडं घ्या. त्यात २ कप पाणी घाला, पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात पापड खार, मीठ व तेल घालून मिक्स करा. मग त्यामध्ये हळूहळू तांदळाचे पीठ घालून हलवत रहा. मिश्रण सतत मिक्स करत राहा. मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करा, व त्यावर ३ मिनिटे झाकण ठेवा.

गुळाचा चहा करण्याची परफेक्ट पद्धत, उन्हाळ्यातही चहा नासण्याचे टेन्शन नाही, चहा होईल फक्कड

एका प्लेटमध्ये तयार तांदळाचे उकडीचे पीठ काढून घ्या.  चकलीच्या सोरयानीला शेवेची चाक लावून तेलाने ग्रीस करा, व त्यात तयार पीठ घाला. आता झाकण बंद करा. एका प्लास्टिक पेपरला तेलाने ग्रीस करा. व त्यावर कुरडई गोलाकार घाला. सर्व कुरड्या घालून झाल्यानंतर कडकडीत उन्हात वाळवून घ्या. पूर्ण वाळल्यानंतर डब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे तांदळाचे कुरडई तयार. हे कुरडई तळल्यानंतर चौपटीने फुलतात. 

Web Title: Rice Kachri, chawal ke phool, Tandalachi Kurdai Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.