Join us  

नैवेद्य दाखवायचाय, मोदक करायला वेळ नाहीये? कुकरमध्ये ५ मिनिटात करा तांदळाची खीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 12:38 PM

Sankashti chaturthi Rice Kheer in Pressure Cooker : कुकरमध्ये ५ मिनिटात करा तांदळाची खीर; झटपट तयार होईल स्वादीष्ट नैवेद्य

उपवासाच्या दिवशी पंच पक्वान्नांचा स्वयंपाक केला नाही तरी  देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय चैन पडत नाही. संकष्टी चतुर्थीच्या (Sankashti chaturthi)दिवशी बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. (How to make rice kheer) ऑफिस, घरातली इतर कामं या सगळ्यात प्रत्येकवेळी मोदक करायला वेळ मिळतोच असं नाही. (Chawal ki Kheer in Pressure Cooker)

मोदकांऐवजी तुम्ही खीर, हलवा किंवा शिरा असे झटपट होणारे पदार्थ नैवेद्याला दाखवू शकता. कुकरमध्ये तांदळाची खीर बनण्याची सोपी रेसेपी पाहूया. ही खीर बनवून तुम्ही कमीत कमी वेळात नैवेद्य आणि जेवणाच्या ताटात ठेवण्यासाठी गोड पदार्थ बनवू शकता. (How to Make Rice Kheer in Cooker)

कुकरमध्ये तांदळाची खीर कशी बनवायची?

ही खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी तांदूळ धुवून घ्या. तांदूळ धुतल्यानंतर एका कुकरमध्ये तांदूळ आणि दूध घालून शिजवून घ्या. कुकर उघडल्यानंतर त्यात एक चमचा कंडेन्स मिल्क, साखर, तळलेले ड्राय फ्रुट्स, आणि केशर घाला. गरज असल्यास आणखी दूध घाला. चमच्यानं हे मिश्रण ढवळून घ्या. थोडावेळ शिजवल्यानंतर गॅस बंद करा. तयार आहे गरमागरम, चवदार तांदळाची खीर. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स