Join us  

तांदळाची झटपट खीर, सोपी रेसिपी आणि झटपट पक्वान्न - प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2024 12:03 PM

Rice Kheer: Special Prasadam for Sri Ram Pran Pratishtha Day : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्या नगरी दुमदुमली आहे. या खास प्रसंगी तांदुळाची खीर खाऊन करा तोंड गोड

सर्वत्र 'भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा' हेच गाणं ऐकू येत आहे. अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) पुन्हा प्रभू श्रीराम विराजमान होणार आहे, त्यामुळे अयोध्या नगरी दुमदुमली आहे. काही दिवसांपूर्वी प्रभू श्रीरामांचे तेजस्वी रूपाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. हातात धनुष्य-बाण, चेहऱ्यावर गोड हास्य, रामललाचे हे तेजस्वी रूप पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

२२ जानेवारी रोजी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. या खास दिनानिमित्त आपण घरात तांदुळाची खीर (Rice Kheer) तयार करू शकता. घरात कोणताही खास प्रसंग असला की आपण गोड पदार्थ तयार करतो (Cooking Tips). जर आपण देखील कोणता तरी गोड पदार्थ तयार करू इच्छित असाल तर, खीर तयार करून प्रत्येकाचे तोंड गोड करा(Rice Kheer: Special Prasadam for Sri Ram Pran Pratishtha Day).

तांदुळाची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

पाणी

दूध

वेलची पूड

साखर

चिरोंजी

थंड वातावरणामुळे पीठ खराब? ३ भन्नाट किचन टिप्स, पिठात किडे - अळ्या होणार नाहीत

काजू-बदाम पावडर

कृती

सर्वप्रथम अर्धी वाटी तांदूळ घ्या. तांदुळात पाणी घालून धुवून घ्या. त्यात पुन्हा एक वाटी पाणी घाला, आणि तांदूळ काही वेळेसाठी भिजत ठेवा. एक लिटर दुधासाठी अर्धी वाटी तांदूळ पुरेशी आहे. आता एका जड तळाच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ आणि थोडे पाणी घालून शिजवण्यासाठी ठेवा. याव्यतिरिक्त आपण तांदुळाची भरड तयार करून त्याचाही वापर करू शकता. तांदूळ शिजल्यानंतर त्यात दूध घाला, आणि मध्यम आचेवर दूध आटवून घ्या. वारंवार चमच्याने ढवळत राहा, कारण खीर तळाला चिकटू शकते. ज्यामुळे खिरीला जळका वास येऊ लागतो.

रवीने घुसळून लोणी काढून करा रवाळ तूप, दाणेदार तुपाची सोपी रेसिपी-बनते १० मिनिटात

दूध आटल्यानंतर त्यात वेलची पूड, एक वाटी साखर, चिरोंजी, काजू-बदाम पावडर घालून मिक्स करा. नंतर पुन्हा चमच्याने मिक्स करा. २ मिनिटांसाठी खीर शिजवून घ्या, व गॅस बंद करून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे चविष्ट तांदुळाची खीर खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स