भारतात चहाचे शौकिन असलेल्यांची कमतरता जराही नाही. काही लोक इतका चहा घेतात की त्यांना कोणत्याही वेळेला चहा आणून दिला तरी त्यांची चहा पिण्याची तयारी असते. असे खूपच कमी लोक असतात ज्यांना चहा आवडत नाही. थंडीच्या दिवसांत गरमागरम चहा प्यायला प्रत्येकालाच आवडते. (Do You Know Right Time Of Adding Ginger In Tea Perfect Taste)
चहात आलं घातल्यास फक्त चव वाढत नाही तर तब्येतीला अनेक फायदे मिळतात. सर्दी, खोकला झाल्यास त्वरीत आल्याचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो. चहात आलं नेमकं कधी घालावं याबाबत बरेच लोक गोंधळलेले असात. पाणी गरम झाल्यानंतर की दूध घातल्यानंतर आलं घालावं याचा विचार प्रत्येकजण करतो. नकळतपणे १०० पैकी ९० टक्के लोक १ चूक करतात.
चहाला परफेक्ट चव प्रत्येक पदार्थ योग्य वेळेवर घातल्यानं येते. बऱ्याच लोकांना चहात आलं कधी घालावं याबाबत कल्पना नसते. चहात दूध, चहा पावडर, साखर घातल्यानंतर आलं घालायला हवं. एक उकळ झाल्यानंतच आलं घालावं. आलं कोणत्या पद्धतीनं घालावं हे समजून घेणंसुद्धा महत्वाचे आहे.
चहात आलं कुटून घातल्यानं काय होतो
चहाच्या टपरीवर असो किंवा घरात, रोज चहा बनवणारे लोक आलं कुटून चहात घालतात. चहा करण्याची ही पद्धत एकदम चुकीची आहे. आलं कुटताना याचा पूर्ण रस भांड्याला लागतो आणि चहातील आल्याची चव कमी होते.
शरीरात रक्त कमी-अशक्तपणा आला? सद्गुरू सांगतात ४ पदार्थ खा, हिमोग्लोबीन भराभर वाढेल
आलं घालण्याची योग्य पद्धत कोणती
चहात आलं कुटून घालण्याऐवजी किसून घालायला हवं. किसून घातल्यानं आल्याचा रस थेट चहात जातो. चव येते आणि चहा कडक बनतो. इतकंच नाही तर चहात आलं किसून घातल्यास रंगातही फरक पडतो. म्हणून चहात आलं किसून घालणं हीच योग्य पद्धत आहे.