पूर्वीच्या काळात स्वयंपाक करण्यासाठी मुख्यत्वे करून मातीच्या भांड्यांचा वापर केला जात असे. परंतु बदलत्या काळानुसार स्टेनलेसस्टील, काचेची भांडी, जर्मन अशा वेगवेगळ्या धातूंपासून बनलेल्या भांड्यांचा वापर केला जाऊ लागला. यामुळे मातीची भांडी वापरणे काळानुरूप मागे पडत गेले. असे असले तरीही मातीच्या भांड्यात स्वयंपाक करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही अन्नपदार्थात फार मोठ्या प्रमाणात राखले जाते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. मातीच्या भांड्यात असणारे लहान छिद्र आग आणि ओलावा समान रीतीने सगळीकडे पसरण्यास मदत करतात ज्यामुळे अन्नातील पोषक तत्त्व सुरक्षित राहतात.
मातीच्या भांड्यात जेवण करण्याचे अनेक फायदे असले तरीही त्यांची स्वच्छता ठेवणे हे तितकेच कठीण काम असते. या भांड्याना वेळच्यावेळी धुवून, पुसून स्वच्छ केले नाही तर अशी मातीची भांडी लवकर खराब होतात. ही भांडी कालांतराने कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ बनवण्यायोग्य राहत नाही. पावसाळयात जसे अन्नपदार्थ किंवा घरातील इतर वस्तुंना बुरशी लागते तसेच घरातील मातीच्या भांडयांना देखील बुरशी लागू शकते. पावसाळ्यातील ओलावा, वातावरणातील आर्द्रता या सगळ्या गोष्टींमुळे मातीच्या भांड्यांना बुरशी लागून त्यातून करपट, तेलकट दुर्गंधी येऊ लागते. असे होऊ नये म्हणून पावसाळ्यात मातीच्या भांड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात मातीची भांडी नेमकी कोणत्या पद्धतीने स्वच्छ करावीत ते पाहूयात(Right Way To Clean & Maintain Clay Pots During Monsoon Season).
पावसाळ्यात मातीची भांडी स्वच्छ करण्याची सोपी पद्धत...
१. सर्वप्रथम मातीच्या भांड्यात पाणी घालून ते गॅसच्या मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. आता पाणी चांगले गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा बेकिंग सोडा घालावा. यामुळे मातीच्या भांड्यांना येणारी करपट, तेलकट दुर्गंधी नाहीशी होते.
२. त्यानंतर या गरम पाण्यांत दोन चमचे मीठ घालावे. मिठामुळे भांड्यांचा अतिरिक्त तेलकटपणा जाऊन भांडी आतून स्वच्छ होण्यास मदत मिळते.
बिडाचा तवा विकत तर आणला पण तो ' सिझन ' कसा करायचा? १० टिप्स, वापरायला झटपट तयार...
३. मीठ घातल्यानंतर या गरम पाण्यात एका लिंबाचा रस पिळून घालावा. लिंबाच्या रसात असणाऱ्या सायट्रिक ऍसिडमुळे मातीची भांडी आतून चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात. (लिंबाच्या रसाऐवजी आपण यात लिंबू सत्व घातले तरीही चालेल).
लोखंडाची कढई, खलबत्ता गंजले आहेत? ५ टिप्स - गंज निघेल झटपट - स्वयंपाक करताना टेन्शन नाही...
४. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर हे पाणी एका पसरट भांड्यात ओतून घेणे. आता यात मातीच्या भांडयाचे झाकण किमान १५ ते २० मिनिटे व्यवस्थित भिजत ठेवा. यामुळे मातीच्या भांड्यांसोबतच त्यांचे झाकण देखील स्वच्छ होऊन निघेल. याचबरोबर झाकण स्वच्छ करून झाल्यानंतर या पसरट भांड्यात मातीचे भांडे देखील बाहेरुन स्वच्छ होण्यासाठी भिजत ठेवावे, यामुळे मातीच्या भांड्यांच्या तळाशी असणारी बुरशी व तेलकटपण निघून जाण्यास मदत मिळेल.
तेलाच्या बाटलीची कॅप काढून फेकून देता ? इतके दिवस आपले चुकले 'असे ' वाटेल, पाहा कॅपचा उपयोग...
५. थोड्या वेळानंतर पाण्यातून हे भांडे काढून हे मातीचे भांडे व झाकण राखेने किंवा बेसन पीठ घेऊन नारळाच्या शेंडीनें घासून घेणे. त्यानंतर हे भांडे स्वच्छ पाण्याने धुवून संपूर्ण कोरडे होईपर्यंत उन्हांत व्यवस्थित वाळवून घ्यावे. हे असे संपूर्ण वाळून कोरडे झालेले भांडे आपण स्वयंपाकासाठी वापरु शकतो.