Lokmat Sakhi >Food > ९० टक्के लोक रताळ्याचे पदार्थ खाताना 'ही' चूक करतात! रताळ्यातले पौष्टिक घटक शरीराला मिळण्यासाठी....

९० टक्के लोक रताळ्याचे पदार्थ खाताना 'ही' चूक करतात! रताळ्यातले पौष्टिक घटक शरीराला मिळण्यासाठी....

Right Way To Eat Sweet Potatoes: रताळे अतिशय पौष्टिक आहेत. पण त्याचे फायदे शरीराला तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही ते योग्य पद्धतीने खाता..(benefits of eating shakarkandi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 11:47 IST2025-01-08T11:46:52+5:302025-01-08T11:47:27+5:30

Right Way To Eat Sweet Potatoes: रताळे अतिशय पौष्टिक आहेत. पण त्याचे फायदे शरीराला तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही ते योग्य पद्धतीने खाता..(benefits of eating shakarkandi)

Right way to eat sweet potatoes, benefits of eating sweet potato or ratale with its peel   | ९० टक्के लोक रताळ्याचे पदार्थ खाताना 'ही' चूक करतात! रताळ्यातले पौष्टिक घटक शरीराला मिळण्यासाठी....

९० टक्के लोक रताळ्याचे पदार्थ खाताना 'ही' चूक करतात! रताळ्यातले पौष्टिक घटक शरीराला मिळण्यासाठी....

Highlightsरताळ्याला बाहेरून बरीच माती लागलेली असते. २ - ३ वेळा धुवूनही ती निघत नाही. त्यामुळे बऱ्याच जणी त्याची सालं काढून टाकतात.

उपवासाच्या दिवशी आवर्जून रताळे खाल्ले जातात. रताळे खरंतर खूप पौष्टिक आहेत. पण बहुतांश कुटूंबांनी मात्र ते उपावासाच्या दिवशीपुरतेच मर्यादित ठेवून दिले आहेत. उपवास आला की हमखास आपल्याला रताळ्याची आठवण येते. पण त्यानंतर मात्र एवढ्या पौष्टिक पदार्थाकडे आपण पाहातही नाही. त्यातही बहुतांश लोक रताळे खाताना एक चूक हमखास करतात (Right Way To Eat Sweet Potatoes). त्यामुळे रताळ्याचे पाहिजे तसे फायदे आपल्या शरीराला मिळत नाहीत (benefits of eating shakarkandi or ratalu). आता ती चूक कोणती आणि रताळे नेमक्या योग्य पद्धतीने कसे खावे ते पाहा..

 

रताळे खाण्याची योग्य पद्धत कोणती?

रताळे खाताना कोणती चूक करणं टाळावं आणि त्यामुळे शरीराला काय नुकसान होऊ शकतं, याविषयी माहिती देणारा व्हिडीओ आहारतज्ज्ञांनी fries.to.fit या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

तासनतास बैठं काम करून मान- पाठ दुखते? ५ मिनिटांत होणारे ३ सोपे व्यायाम- लगेच मिळेल आराम

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की रताळे खाताना आपण त्याची सालं काढून खातो. यामुळे आपल्या शरीराला त्यातून पाहिजे तसे फायदे मिळत नाहीत. रताळ्याला बाहेरून बरीच माती लागलेली असते. २ - ३ वेळा धुवूनही ती निघत नाही. त्यामुळे बऱ्याच जणी त्याची सालं काढून टाकतात. पण असं करणं टाळा. कारण रताळ्या एवढेच फायदे त्याच्या सालांमधून मिळतात.

 

रताळे सालासकट खाण्याचे फायदे

१. रताळ्याच्या सालींमध्ये पचनक्रियेसाठी पोषक असणारे अनेक घटक असतात. त्यामुळे ज्यांना नेहमीच अपचनाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी रताळी सालींसकट खाणे खूप फायदेशीर ठरते. 

मुलांच्या युनिफॉर्मवर, ऑफिसच्या पांढऱ्याशुभ्र शर्टवर शाईचे डाग पडले? १ सोपा उपाय- डाग होतील गायब

२. रताळ्याच्या सालींखालच्या भागात भरपूर प्रमाणात फायबर असतात. जेव्हा तुम्ही रताळ्याच्या साली काढून टाकता तेव्हा त्यासाेबत रताळ्यातले जवळपास ६० ते ७० टक्के फायबर निघून जातात.

३. रताळ्याच्या साली काढून टाकल्याने त्यातील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम बऱ्याच प्रमाणात कमी होते. त्यामुळे वरील सगळ्याच पौष्टिक घटकांचा लाभ शरीराला होण्यासाठी रताळे नेहमी सालांसकटच खावे. 


 

Web Title: Right way to eat sweet potatoes, benefits of eating sweet potato or ratale with its peel  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.