भेंडीची भाजी (Bhindi) म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात कारण भेंडी अनेकदा चिकट, गचगचीत होते. भेंडीची भाजी करण्याची परफेक्ट पद्धत सर्वांनाच माहित असते असं नाही. (Cooking Tips) भेंडी धुण्यापासून भाजी कढईत शिजेपर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. भेंडीची भाजी कुरकुरीत होण्यासाठी ती कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Crispy Non Sticky Bhindi)
कुरकुरीत भेंडी करण्याची सोपी रेसिपी (How To Make Crispy Bhindi)
1) सगळ्यात आधी भेंडी स्वच्छ धुवून घ्या. भेंडी धुतल्यनंतर स्वच्छ सुती कापडाने पूसून घ्या. भेंडी पुसल्यानंतर हवेखाली ठेवून पूर्णपणे कोरडी करून घ्या. त्यानंतर भेंडीचे शेवटचे आणि पुढचे टोक काढून भेंडी लांबट चिरून घ्या. भेंडीचा आकार लहान असेल तर जास्त २ भाग करून न घेता लांबट तुकडे करा.
2) चिरलेली भेंडी एका बाऊलमध्ये काढून त्यात ३ चमचे बेसनाचं पीठ घाला, अर्धा टिस्पून हळद, काश्मिरी लाल मिरची अर्धा टिस्पून, धणे पावडर अर्धा चमचा, आमसूल पावडर अर्धा टिस्पून घाला. हे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर हातानं किंवा चमच्याने भेंडी एकजीव करून घ्या.
3) कढईत तेल गरम करायला ठेवून त्यात मोहोरी, जीर व्यवस्थित तडतडू द्या. त्यानंतर त्यात कांदा आणि हिरवी मिरची, लाल मिरची घाला, चमच्याने कांदा परतवून घ्या. त्यात लसणाची पेस्ट, हळद घालून नंतर भेंडीचे काप घाला. नंतर यात मीठ घालून पुन्हा एकजीव करून घ्या.
पाठीत- गुडघ्यांमध्ये वेदना-हाडं कमजोर झाली? रामदेव बाबा सांगतात १ खास उपाय, दुखणं होईल कमी
4) ५ ते १० मिनिटं भेंडी शिजू द्या. भेंडी शिजवताना झाकण ठेवू नका अन्यथा भेंडी जास्त चिकट होते. यात तुम्ही आवडीनुसार १ ते २ चमचे शेंगदाण्याचं कुट घालू शकता. तयार आहे कुरकुरीत भेंडीची भाजी. नेहमी भेंडीच्या भाजीला नाही म्हणणारे लोकही क्रिस्पी भेंडी आवडीने खातील.