Lokmat Sakhi >Food > फक्त ४ चमचे तेलात पोह्यांचा कुरकुरीत चिवडा अगदी १५ मिनिटांत, दिवाळी स्पेशल चिवडा रेडी

फक्त ४ चमचे तेलात पोह्यांचा कुरकुरीत चिवडा अगदी १५ मिनिटांत, दिवाळी स्पेशल चिवडा रेडी

Roasted Poha Chivda/Low Oil Crispy Crunchy Chivda recipe : छोटया कढईमध्ये बनवा न आकसणारा, कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2024 05:04 PM2024-10-20T17:04:18+5:302024-10-21T10:51:47+5:30

Roasted Poha Chivda/Low Oil Crispy Crunchy Chivda recipe : छोटया कढईमध्ये बनवा न आकसणारा, कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा

Roasted Poha Chivda/Low Oil Crispy Crunchy Chivda recipe | फक्त ४ चमचे तेलात पोह्यांचा कुरकुरीत चिवडा अगदी १५ मिनिटांत, दिवाळी स्पेशल चिवडा रेडी

फक्त ४ चमचे तेलात पोह्यांचा कुरकुरीत चिवडा अगदी १५ मिनिटांत, दिवाळी स्पेशल चिवडा रेडी

दिवाळीला (Deepavali) अवघे काही दिवस उरलेत. अनेकांकडे साफसफाईही केली जात (Diwali 2024). साफसफाईनंतर केला जातो तो फराळ. चिवडा, चकली, शंकरपाळ्या, करंजी आणि लाडू. हे पदार्थ हमखास केले जातात (Faral). हे पदार्थ बनवायला अवघड असतात. कारण प्रमाण चुकलं तर, पदार्थही फसतो (Chivda Recipe). त्यामुळे बरेच लोक घरी बनवणं टाळतात. घरच्याघरी करायला सोपा आणि खायला चविष्ट, चवदार असा पदार्थ म्हणजे चिवडा.

चिवडा देखील अनेक प्रकारचा केला जातो. कुणी पोह्याचा, मक्याचा तर कोणी कुरमुऱ्याचा हलका फुलका चिवडा तयार करतात. शक्यतो बऱ्याच घरांमध्ये पोह्याचा चिवडा हमखास केला जातो. पण पोह्याचा चिवडाही नरम पडतो. मसाला व्यवस्थित एकजीव होत नाही, किंवा पोहे नीट भाजले जात नाही. बऱ्याचदा चिवड्यामध्येही तेलाचे प्रमाण जास्त होते. जर आपल्याला हेल्दी आणि झटपट पद्धतीचा चिवडा करायचा असेल तर, ही रेसिपी नक्कीच फॉलो करा(Roasted Poha Chivda/Low Oil Crispy Crunchy Chivda recipe).

पोह्याचा कुरकुरीत चिवडा करण्यासाठी लागणारं साहित्य

पातळ पोहे

तेल

शेंगदाणे

काजू

बदाम

चणा डाळ

सुकं खोबरं

हिरवी मिरची

कडीपत्ता

मुलं रात्री लवकर झोपत नाहीत? दंगा करतात? आईबाबांसाठी ५ टिप्स; मुले झोपतील शांत

मनुके

हळद

लाल तिखट

चाट मसाला

आमचूर पावडर

मीठ

पिठी साखर

कृती

सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ कप पोहे घालून भाजून घ्या. ५-६ मिनिटांसाठी मिडीयम फ्लेमवर पातळ पोहे भाजून घ्या. ५ मिनिटांनंतर हाताने पोहे कुरकुरीत भाजले गेले आहेत की नाही, हे चेक करा. पोहे भाजताना सतत हलवत राहा. जेणेकरून पोहे करपणार नाही.

पोहे भाजून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्याच कढईमध्ये ४ टेबलस्पून तेल घाला. नंतर त्यात एक कप शेंगदाणे घालून भाजून घ्या. शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम मिडीयम ठेवा. शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.

नंतर त्यात बारीक चिरलेले काजू, बदाम देखील भाजून घ्या. भाजलेलं सर्व साहित्य एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात एक कप भाजलेली चणा डाळ, एक वाटी बारीक चिरलेलं सुकं खोबरं घालून भाजून एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, कडीपत्ता घालून भाजून घ्या. नंतर पोहे सोडून सर्व साहित्य कढई मध्ये घ्या. त्यात एक कप मनुके घाला. आणि एका मिनिटासाठी भाजून घ्या.

स्वयंपाकघर स्वच्छ करताना नाकीनऊ येतात? ५ रुपयाच्या 'या' गोष्टीचा करा वापर; पूर्ण किचन होईल स्वच्छ

नंतर त्यात २ चमचे हळद, एक चमचा काश्मिरी लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, एक टेबलस्पून आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, २ चमचा पिठीसाखर घालून सर्व साहित्य एकजीव करा. ५ मिनिटांनंतर त्यात भाजलेले पोहे घालून सर्व साहित्य मिक्स करा.

शेवटी थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात काढून घ्या. अशा प्रकारे दिवाळी स्पेशल कुरकुरीत पोह्यांचा चिवडा खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Roasted Poha Chivda/Low Oil Crispy Crunchy Chivda recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.