Lokmat Sakhi >Food > रोस्टेड पोटॅटो; घरगुती पार्टीसाठी चटपटीत स्टार्टर! झटपट होतो, फटक्यात  संपतो

रोस्टेड पोटॅटो; घरगुती पार्टीसाठी चटपटीत स्टार्टर! झटपट होतो, फटक्यात  संपतो

घरगुती पार्टीचा मेन्यू साधा असेल तर स्टार्टर खमंग आणि चटपटीत करावं. विशेष म्हणजे कमी वेळात होणारा पदार्थ स्टार्टरसाठी निवडावा. असा सोपा पदार्थ म्हणजे रोस्टेड पोटॅटो. घरगुती छोट्या मोठ्या पार्टीसाठीचा बेस्ट मेन्यू.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 06:37 PM2021-12-31T18:37:33+5:302021-12-31T18:42:17+5:30

घरगुती पार्टीचा मेन्यू साधा असेल तर स्टार्टर खमंग आणि चटपटीत करावं. विशेष म्हणजे कमी वेळात होणारा पदार्थ स्टार्टरसाठी निवडावा. असा सोपा पदार्थ म्हणजे रोस्टेड पोटॅटो. घरगुती छोट्या मोठ्या पार्टीसाठीचा बेस्ट मेन्यू.

Roasted potatoes; Spicy and perfect starte menu r for a mini party! | रोस्टेड पोटॅटो; घरगुती पार्टीसाठी चटपटीत स्टार्टर! झटपट होतो, फटक्यात  संपतो

रोस्टेड पोटॅटो; घरगुती पार्टीसाठी चटपटीत स्टार्टर! झटपट होतो, फटक्यात  संपतो

Highlightsरोस्टेड पोटॅटो करताना बटाट्याची सालं काढावीत. सालांसह हा पदार्थ करायचा असेल तर बटाटे नीट धुवून् पुसून् घ्यावेत.  रोस्टेड पोटॅटोसाठी ऑलिव्ह ऑइलच घ्यावं. ओव्हनच्या ट्रेमधे बटाट्याच्या फोडी रोस्ट करण्यासाठी  कशाही नाही तर नीट रचून ठेवाव्यात. 

शनिवार रविवार या दिवशी काहीतरी वेगळं खावंसं वाटतं त्यातच नवीन वर्ष सेलिब्रेशन मूड तर प्रत्येक घरात 31 डिसेंबर नंतरही टिकून राहाणार आहे. कारण शनिवार रविवार. घरगुती पार्टीचा मेन्यू साधा सोपा, चविष्ट ठेवला तर मग घरगुती पार्टीमधे बसून गप्पा मारण्याचा  आणि केलेले पदार्थ खाण्याचा आनंद घेता येतो. नाहीतर घरातल्या बाईचा वेळ पदार्थ करण्यातच जातो. पार्टी संपायची वेळ आली तरी बसायला वेळ मिळत नाही, हा अनेकींचा अनुभव.

घरात पार्टी आहे म्हटलं की हे कर ते कर अशा घरातल्यांच्या याद्या तयारच. या यादीतल्या पदार्थांचं टेन्शन न घेता आपण ठरवलेला मेन्यूही  विशेष होईल आणि सर्वांना आवडेल.  पार्टीचा मेन्यू साधा असेल तर स्टार्टर खमंग आणि चटपटीत करावं. विशेष म्हणजे कमी  वेळात होणारा पदार्थ स्टार्टरसाठी निवडावा. असा सोपा पदार्थ म्हणजे रोस्टेड पोटॅटो. घरगुती छोट्या मोठ्या पार्टीसाठीचा बेस्ट मेन्यू. झटक्यात होतो, फटक्यात संपतो.

Image: Google
 

रोस्टेड पोटॅटो कसे कराल?

रोस्टेड पोटॅटो तयार करण्यासाठी 4 मध्यम आकाराचे बटाटे, 2 मोठे चमचे ऑलिव्ह तेल, अर्धा चमचा मीठ,  अर्धा छोटा चमचा ओबड थोबड कुटलेले मिरे. अर्धा चमचा आरगेनो, छोटा चमचाभर कसूरी मेथी आणि अर्धा चमचा तिळाचं तेल घ्यावं. 

रोस्टेड पोटॅटो तयार करताना सर्वात आधी बटाटे छिलून त्याची सालं काढून् घ्यावीत.  बटाटा उभा कापून त्याचे दोन भाग करावेत.  बटाट्याचा लांबट तुकडा मधून कापून त्याचे दोन भाग करावेत.  मग बटाट्याची प्रत्येक् तुकडा घेऊन् त्याचे दोन समान भाग करावेत. अशा प्रकारे बटाटे कापून घ्यावेत. आता एका मोठ्या आणि खोलगट भांड्यात ऑलिव तेल, मीठ, ओबडधोबड कुटलेले मिरे, आरगेनो, कसूरी मेथी आणि इतर मसाले घालून ते चांगले मिसळून घ्यावेत. दोन मोठे लांबट काप करावेत. 

Image: Google

बटाट्याच्या फोडी या मसाल्यात घालाव्यात. सर्व फोडींना मसाला चांगला लागेपर्यंत फोडी चांगल्या हलवून घ्याव्यात. फोडींवर मसाल्याचं कोटिंग चांगलं बसायला हवं. मग त्यात थोडं तिळाचं तेल घालून् बटाट्याची फोडी पुन्हा चांगल्या हलवून घ्याव्यात. मायक्रोवेव 180 डि.से. वर प्रिहीट करुन घ्यावा. मसाला लावलेल्या बटाट्याच्या फोडी ट्रेमधे एक एक करुन नीट ठेवाव्यात. हा ट्रे मायक्रोवेवमधे ठेवावा. 180 डि.से. वर मायक्रोवेवमधे बटाटे 35 मिनिटं भाजावेत. 35 मिनिटानंतर रोस्टेट पोटॅटो मायक्रोवेवमधून् काढवेत. पुदिन्याची हिरवी चटणी, मेयोनीज, टोमॅटो साॅस यासोबत् छान लागतात. 
 

Web Title: Roasted potatoes; Spicy and perfect starte menu r for a mini party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.