Join us  

उरलेल्या पोळ्यांचे करा खुसखुशीत कटलेट्स, बघा भरपूर भाज्या घालून केलेली चवदार रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2024 5:19 PM

Yummy Tasty Cutlets From Leftover Chapati: पोळ्या उरल्या असतील तर त्याचा नेहमीचा तोच तो कुस्करा करण्यापेक्षा अतिशय चवदार असे कटलेट्स करा, बघा एकदम यम्मी, टेस्टी रेसिपी (how to make cutlets from basi roti)

ठळक मुद्देया रोटी कटलेट्सच्या निमित्ताने मुलांच्या पोटात भरपूर भाज्याही जातील. बघा कसे करायचे उरलेल्या पोळ्यांचे रोटी कटलेटस्..

असं बऱ्याचदा होतं की सकाळी केलेल्या पोळ्या संध्याकाळी उरतात. मग त्या पोळ्यांचं काय करावं ते कळत नाही. नेहमी तोच तो कुस्करा करूनही खावा वाटत नाही. अशावेळी मग उरलेल्या पोळ्या संपवाव्या कशा असा प्रश्न पडला असेल तर ही एक मस्त रेसिपी पाहून घ्या (what to do with leftover rotis?). हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मग संध्याकाळी चहासोबत स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. मुलांना हा पदार्थ अतिशय आवडेल (how to make cutlets from basi roti?). शिवाय या रोटी कटलेट्सच्या निमित्ताने मुलांच्या पोटात भरपूर भाज्याही जातील. बघा कसे करायचे उरलेल्या पोळ्यांचे रोटी कटलेटस्..(roti cutlets from leftover chapati)

उरलेल्या पोळ्यांचे कटलेट्स करण्याची रेसिपी 

 

साहित्य

४ ते ५ पोळ्या

२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे

चिमूटभर हळद

मुलांच्या पोटात जंत झाले हे कसं ओळखायचं? डॉक्टर सांगतात ५ टिप्स, मुलांमध्ये 'ही' लक्षणं दिसली तर....

१ टीस्पून धने- जीरेपूड

१ टीस्पून आलं- लसूण पेस्ट

२ ते ३ हिरव्या मिरच्यांचे बारीक केलेल तुकडे

कांदा, सिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर अशा किसून घेतलेल्या भाज्या सगळ्या मिळून १ वाटी

२ टेबलस्पून तेल

चवीनुसार मीठ

 

कृती 

सगळ्यात आधी तर पोळ्या मिक्सरमधून फिरवून घ्या. खूप बारीक न करता थोड्या जाड्याभरड्या ठेवा.

पोळ्यांचा कुस्करा एका भांड्यात काढा. त्यामध्ये उकडलेले बटाटे,  भाज्यांचा किस आणि इतर सगळे साहित्य टाकून ते व्यवस्थित कालवून एकजीव करून घ्या.

अभ्यासक सांगतात दररोज ११ मिनिटे चाला आणि ११ फायदे मिळवा! बघा हा कोणता भन्नाट उपाय...

आता हे मिश्रण खूप मोकळं वाटत असेल, त्याचे व्यवस्थित कटलेट्स तयार करता येत नसतील, तर त्यामध्ये थोडं दही घातलं तरी चालेल. छान तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे कटलेट्स तयार करून घ्या. त्यांना हवंतर तुम्ही तिळामध्येही घोळून घेऊ शकता, जेणेकरून त्यांचा कुरकुरीतपणा वाढेल. 

५ पदार्थ दररोज खा- बघा भरपूर प्रोटीन देणारे सुपरफूड! रोजच्या आहारातले स्वस्त पदार्थ

आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवा. तो तापल्यानंतर त्यात तेल टाका. तेल गरम झालं की आपण तयार केलेले कटलेट्स टाकून ते शॅलोफ्राय करा.. कटलेट्स सोनेरी रंगाचे झाले की ते पॅनबाहेर काढून घ्या. असे छान गोल्डन रंगाचे क्रिस्पी कटलेट्स टोमॅटो सॉससोबत खायला खूप छान लागतात. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती