Join us  

फोडणीची पोळी नेहमीचीच, करून पाहा चमचमीत टिक्की; चविष्ट नाश्ता रेसिपी - टिफिनसाठी बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2024 10:12 AM

Roti ki Tikki Recipe | Roti Cutlets Recipe : उरलेल्या पोळीची चविष्ट टिक्की कशी करायची? पाहा सोपी रुचकर रेसिपी

बऱ्याच घरांमध्ये चपाती उरते. चपाती, भात उरला तर आपण फोडणी देऊन खातो (Roti ki Tikki). पण फोडणीची पोळी खाऊन वारंवार कंटाळाही येतो. काहीतरी हटके खाण्याची इच्छा होते, पण काय करावं हे सुचत नाही (Food). उरलेल्या पोळीला फोडणी देऊन आपण खाल्लीच असेल (Cooking Tips). पण कधी त्याची चमचमीत टिक्की करून पाहिली आहे का?

बहुतांश घरांमध्ये बटाटा किंवा इतर भाज्यांची टिक्की केली जाते. पण जर आपल्याला सायंकाळच्या नाश्त्याला काहीतरी हटके खायचं असेल तर, उरलेल्या पोळीची चमचमीत टिक्की करून पाहा. जबरदस्त हेल्दी नाश्ता पोटभर खा. किंवा आपण ही टिक्की मुलांना टिफिनसाठीही देऊ शकता. उरलेल्या पोळीची टिक्की कशी करायची? पाहूयात(Roti ki Tikki Recipe | Roti Cutlets Recipe).

उरलेल्या पोळीची चमचमीत टिक्की करण्यासाठी लागणारं साहित्य

उरलेली चपाती

कांदा

ढोबळी मिरची

गाजर

बीटरूट

बटाटे

लाल तिखट

जान्हवी कपूरला आवडतो तसा करा मुगाचा डोसा, वाटीभर हिरव्या मुगाचा झटपट पदार्थ-वजन वाढवत नाही

हळद

धणे पूड

चाट मसाला

मीठ

पांढरे तीळ

कोथिंबीर

तेल

कृती

सर्वात आधी कांदा, हिरवी ढोबळी मिरची, गाजर, बीटरूट घालून बारीक चिरून घ्या. आपण आपल्या आवडीनुसार त्यात भाज्यांचा वापर करू शकता. आता मिक्सरच्या भांड्यात उरलेल्या पोळीचे तुकडे करून घाला, व बारीक वाटून घ्या. एका बाऊलमध्ये बारीक वाटून घेतलेली पोळी, बारीक चिरलेल्या भाज्या, उकडलेले बटाटे, लाल तिखट, हळद, धणे पूड, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून हाताने मिक्स करा.

इडली फुलत नाही? कडक होते? कपभर रव्याची करा स्पॉन्जी इडली; नुसता रव्याचा लगदा होणे टळेल

शेवटी किसलेलं चीज, एक चमचा पांढरे तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून मिक्स करा, व हातावर थोडं मिश्रण घेऊन टिक्कीचा आकार द्या. एका पॅनमध्ये २ चमचे तेल घालून पसरवा, त्यात टिक्की ठेऊन दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे उरलेल्या पोळीची चमचमीत टिक्की खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स