Join us  

चपात्या नीट फुगत नाही-वातड होतात? कणकेत १ चमचा 'ही' पावडर मिसळा, मऊ होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 2:07 PM

Roti Making Hacks (Chapati Kashi Banvaychi) : जर पीठ बरोबर नसेल तर चपाती फुलत नाही आणि सॉफ्टही होत नाही.

आपण बनवत असलेल्या चपात्या मऊ, फुललेल्या व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेक कारणांमुळे चपात्या कधी वातड होतात तर कधी कच्च्या राहतात. चपाती फुगवणं काही सोपं काम नाही. त्यासाठी तुम्ही चपातीचं पीठ कसं मिळता, त्यात काय घालता हे फार महत्वाचं असतं.(Cooking Hacks) जर पीठ बरोबर नसेल तर चपाती फुलत नाही आणि सॉफ्टही होत नाही.(How To Make Soft And Fluffy Roti With Baking Powder)

रोस्टॉरंट किंवा ढाब्यावर तुम्ही जेवायला  जाता तेव्हा चपाती मऊ होते. १ सोपी ट्रिक वापरून तुम्ही मऊ-मुलायम चपात्या बनवू शकता. बेकिंग पावडरच्या मदतीनं चपाती सॉफ्ट कशी करायची ते पाहूया. (How To Make Soft And Fluffy Roti With Baking Powder)

विंचरताना केसांचे पुंजके निघतात-खूप पातळ झाले? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा जादूई उपाय, दाट होतील केस

१) कोरड्या पिठात बेकिंग पावडर मिसळा

चपातीचं पीठ जेव्हा तुम्ही ताटात घ्याल तेव्हा त्यात बेकिंग पावडर मिसळा ही सोपी पद्धत आहे. बेकिंग पावडर व्यवस्थित चपातीच्या पिठात एकजीव करा.   ज्यामुळे छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये चपाती बनेल आणि मऊ-फुललेली होईल.

चपातीच्या पिठात अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. पाणी घालण्याआधी  पीठ आणि बेकिंग सोडा व्यवस्थित मिसळा. अन्यथा पावडर एकाच ठिकाणी राहील. त्यानंतर पीठ मऊ  होण्यासाठी तुम्ही यात पाणी घालून पीठ मळू शकता.  बेकिंग पावडर एक असा इंग्रेडिएंट आहे ज्यामुळे चपाती फुलण्यास मदत होते. सोडा पाण्यात मिसळल्यानंतर सक्रिय होतो आणि चपात्या मऊ बनतात.

२) दह्यासोबत बेकिंग पावडर मिसळा

पीठ मळताना त्यात दही मिसळायला विसरू नका. नंतर व्यवस्थित पीठ मळून घ्या. दही आणि बेकींग सोडा  पिठाला लवचीक बनवते ज्यामुळे चपाती मऊ होते.  दह्यात अर्धा  छोटा चमचा बेकिंग पावडर मिसळा. नंतर हे मिश्रण पिठात मिसळा. नंतर गरम पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्या. चपाती करण्याआधी पीठ २० ते ३० मिनिटांसाठी असंच ठेवून द्या. दही आणि बेकिंग सोड्याच्या मिश्रणानं चपात्या मऊ, मुलायम होतील.

चपात्या कडक होऊ नयेत यासाठी काय करायचं?

चपाती मऊ होण्यासाठी सर्व बाजूंनी समान लाटा. कोणत्याही बाजूनं जाड किंवा बारीक असू नयेत. चपाती  करताना हलक्या हातानं दाबा. चपाती तव्यावर ठेवण्याआधी तवा व्यवस्थित गरम होऊ द्या. त्यानंतर चपात्या मध्यम किंवा उच्च आचेवर शिजवून  घ्या. चपातीत छोटे बबल्स येऊ लागतील तेव्हा चपाती ऊलटी करा आणि चमच्यानं किंवा कापडानं व्यवस्थित दाबा. चपाती शिजल्यानंतर  मऊ राहण्यासाठी तूप किंवा तेलाचा वापर करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स