ऊन्हाळ्याच्या दिवसांत अनेकदा कैरी-आंब्याचे पदार्थ स्वंयपाकासाठी वापरले जातात. (Summer Special Dishes) कैरीची डाळ, कैरीची पन्ह, कैरीची चटणी असे पदार्थ रोजच्या जेवणासाठी उत्तम ठरते. (Cooking Hacks & Tips) जास्तवेळ न घालवता कमीत कमी वेळेत तुम्ही कैरीची चटणी बनवू शकता. कैरीची आंबट गोड चटणी खाऊन तुमची भूक खवळेल आणि नवनवीन पदार्थ खाण्याचा आनंद घेता येईल. (How to Make Row Mango Chutney)
कैरीची चटणी पारंपारीक पद्धतीने कशी करायची? (How to Make Row Mango Chutney)
कच्च्या कैरीची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी कैरी पाटा वरवंट्यावर ठेवा. मुसळीच्या साहाय्याने कैरी बारीक करून घ्या. त्यात कोथिंबीर, मिरची, लसूण,जीरं घालून वाटून घ्या. त्यात थोडं मीठ घालून हाताने चटणी एकजीव करून घ्या. मध्ये गोल करून त्यात फोडणी घाला. फोडणीसाठी एका फोडणी पात्रात तेल गरम करून मिरची पावडर घाला. चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्या. भाकरीबरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे.
कैरीची चटणी करण्याची सोपी पद्धत
साहित्य
१) कोथिंबीर- १०० ग्रॅम
२) कैऱ्या- २
३) हिरव्या मिरच्या - ४ ते ५
४) लसूण पाकळ्या - ७ ते ८
५) साखर- १ टिस्पून
६) भाजलेलं जीरं- अर्धा टिस्पून
७) लिंबाचा रस -१ टिस्पून
८) मीठ - चवीनुसार
१०) पाणी- गरजेनुसार
कैरीची चटणी कशी करायची
सगळ्यात आधी कैरी सोलून धुवून घ्या. कैरीचे तुकडे, हिरवे धणे, खोबरे, हिरवी मिरची, लसूण, भाजलेले जिरे, साखर, मीठ आणि लिंबाचा रस मिक्सर जारमध्ये टाका. थोडे थोडे पाणी घालून सर्व साहित्य बारीक वाटून घ्या. तयार चटणी एका काचेच्या बरणीत ठेवा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि इच्छित पदार्थांसह सर्व्ह करा.