Lokmat Sakhi >Food > फक्त १ वाटी साबुदाणा - बटाट्याचे करा चौपट फुलणारे, पळी पापड, उपवासाच्या कुरकुरीत पापडांची रेसिपी...

फक्त १ वाटी साबुदाणा - बटाट्याचे करा चौपट फुलणारे, पळी पापड, उपवासाच्या कुरकुरीत पापडांची रेसिपी...

Sabudana batat Papad : How To Make Sabudana Batata Pali Papad : यंदा वाळवणाच्या पदार्थात साबुदाणा - बटाट्याचे पळी पापड करायला विसरु नका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2025 12:15 IST2025-04-01T12:02:46+5:302025-04-01T12:15:58+5:30

Sabudana batat Papad : How To Make Sabudana Batata Pali Papad : यंदा वाळवणाच्या पदार्थात साबुदाणा - बटाट्याचे पळी पापड करायला विसरु नका...

Sabudana batat Papad How To Make Sabudana Batata Pali Papad | फक्त १ वाटी साबुदाणा - बटाट्याचे करा चौपट फुलणारे, पळी पापड, उपवासाच्या कुरकुरीत पापडांची रेसिपी...

फक्त १ वाटी साबुदाणा - बटाट्याचे करा चौपट फुलणारे, पळी पापड, उपवासाच्या कुरकुरीत पापडांची रेसिपी...

उन्हाळा म्हटलं की, अनेक घरोघरी वाळवणं घातली जातात. आजही कित्येक घरांमध्ये वर्षभर पुरेल इतकी वाळवणं घालून एकदाच तयार केली जातात. या वाळणात आपण वेगवेगळ्या (How To Make Sabudana Batata Pali Papad) प्रकारचे पापड, कुरडया, फेण्या, लोणची, सांडगे तयार करतो. या वाळवनातील सर्वात लोकप्रिय आणि प्रत्येक घरोघरी हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाण्याचे पापड(Sabudana batat Papad).

हे साबुदाण्याचे पांढरेशुभ्र पापड आपण उपवासाला किंवा सणावाराला आवर्जून तळून खातो. इतकेच नव्हे तर काहीवेळा ताटात नावडती भाजी असली की तोंडी लावायला म्हणून या साबुदाण्याचा पापड अगदी आवडीने खाल्ला जातो. साबुदाणा - बटाटयाची चकली, बटाटा वेफर्स असे इतरही अनेक पदार्थ तयार केले जातात, परंतु साबुदाणा - बटाट्याचे पापड पळी पापड मात्र सगळ्यांच्याच विशेष आवडीचे असतात. यासाठीच यंदाच्या उन्हाळयात वाळवण घालणार असाल तर हे साबुदाणा - बटाट्याचे पळी पापड नक्की करुन पाहा. 

साहित्य :- 

१. बटाटे - २ (मध्यम आकाराचे)
२. साबुदाणे - १ किलो 
३. पाणी - गरजेनुसार
४. मीठ - चवीनुसार
५. रंग - तुमच्या आवडीनुसार (पर्यायी) 
६. जिरे - १ टेबलस्पून 

चैत्रगौरी स्पेशल : फक्त १५ मिनिटांत करा भूईमुगाचे वडे, हळदीकुंकू समारंभासाठी स्पेशल बेत-उपवासालाही चालतो!


उन्हाळ्यात इडली-डोशाचे पीठ जास्तच आंबते-फसफसते? पीठ आठवडाभर टिकण्यासाठी ‘ही’ पाहा युक्ती...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी कच्चा बटाटा स्वच्छ धुवून मग त्याची सालं काढून घ्यावीत. आता सालं काढलेला हा बटाटा किसणीवर किसून त्याचा किस तयार करून घ्यावा. त्यानंतर हा किस २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून मग मिठाच्या पाण्यात भिजवत ठेवावा. मग एका टोपात पाणी घेऊन त्यात रात्रभर भिजवलेले साबुदाणे घालून ते पाण्यांत शिजवून घ्यावे. 

उन्हाळ्यात साजूक तूप करण्यासाठी साठवलेली साय खराब होते? ८ टिप्स - तूप होईल शुभ्र - दाणेदार...

२. साबुदाणे थोडे हलकेच शिजल्यानंतर त्यात किसलेला बटाटा, जिरे, चवीनुसार मीठ घालावे. आता हे मिश्रण सतत चमच्याने हलवत राहून व्यवस्थित ढवळून घ्यावे. जर तुम्हाला रंगीत पापड करायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यात खायचे रंग घालू शकता. 

३. हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर एका प्लास्टीकच्या कागदाला तेल लावून त्यावर वरणाच्या  चमच्याच्या मदतीने छोटे गोलाकार पापड घाला. २ ते ३ दिवस ऊन्हात सुकवल्यानंतर पळीपापड तयार झालेले असतील. त्यानंतर गरम तेलात घालून पापड तळून घ्या. 

साबुदाणा बटाट्याचे पापड  सुकवायला घालताना प्लास्टीक तपासून घ्या. कारण जर प्रिटेंट किंवा  कलरफुल प्लास्टीक असेल तर याचा रंग पापडांना लागू  शकतो. म्हणून शक्यतो प्लेन पारदर्शक प्लास्टीकचा वापर करा. बटाटा आणि साबुदाण्याचे पापड  करण्यासाठी तुम्ही जास्त मोठे बटाटे घेऊ नका. मध्यम आकाराच्या बटाट्यांची निवड करा. 

वर्षभर खाता येतील असे बटाटा - साबुदाण्याचे मस्त कुरकुरीत पापड खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: Sabudana batat Papad How To Make Sabudana Batata Pali Papad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.