Lokmat Sakhi >Food > खिचडी - वडे खाऊन कंटाळलात? कपभर साबुदाण्याच्या करा खमंग खुसखुशीत पुऱ्या; उपवासासाठी बेस्ट

खिचडी - वडे खाऊन कंटाळलात? कपभर साबुदाण्याच्या करा खमंग खुसखुशीत पुऱ्या; उपवासासाठी बेस्ट

Sabudana poori recipe | upvas recipes for fast : अगदी १० मिनिटात तयार होतील साबुदाणा - बटाट्याच्या खमंग पुऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2024 10:00 AM2024-07-02T10:00:01+5:302024-07-02T10:05:02+5:30

Sabudana poori recipe | upvas recipes for fast : अगदी १० मिनिटात तयार होतील साबुदाणा - बटाट्याच्या खमंग पुऱ्या

Sabudana poori recipe | upvas recipes for fast | खिचडी - वडे खाऊन कंटाळलात? कपभर साबुदाण्याच्या करा खमंग खुसखुशीत पुऱ्या; उपवासासाठी बेस्ट

खिचडी - वडे खाऊन कंटाळलात? कपभर साबुदाण्याच्या करा खमंग खुसखुशीत पुऱ्या; उपवासासाठी बेस्ट

उपवासाला आपण साबुदाण्याचे पदार्थ खातो किंवा फळहार करतो (Sabudana Poori). बरेच जण उपवासाला आवर्जून साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर किंवा साबुदाण्याचे वडे खातात (Cooking Tips). शिवाय काही जण साबुदाणा पिठाच्या पुऱ्या देखील करतात. पण अनेकांना साबुदाणाच्या पुऱ्या कशा करायच्या हे ठाऊक नसते.

जर आपल्याला साबुदाण्याची खिचडी आणि वडे खाऊन कंटाळा आला असेल तर, साबुदाण्याची पुरी हा बेस्ट ऑप्शन आहे. साबुदाण्याची पुरी बनवण्यासाठी आपल्याला फार मेहनत घेण्याची गरज नाही. साबुदाणे न भिजवता ही झटपट रेसिपी तयार होते. शिवाय साबुदाण्याचं विकतचं पीठ देखील आपल्याला आणण्याची गरज नाही. साबुदाण्याची पुरी नेमकी कशी करायची? पाहूयात(Sabudana poori recipe | upvas recipes for fast).

साबुदाण्याची पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य

साबुदाणे

बटाटे

कोथिंबीर

हिरवी मिरची

रोजच्या भाकरीला द्या नवा ट्विस्ट, कधी पौष्टीक मसाला भाकरी ट्राय करून पाहिली आहे का? टिफिनसाठीही बेस्ट

आलं

काळी मिरी पावडर

मीठ

शेंगदाण्याचं कूट

तेल

कृती

सर्वात आधी पॅनवर एक कप साबुदाणा घालून भाजून घ्या. साबुदाणा भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची पावडर तयार करा. एका प्लेटमध्ये साबुदाण्याचं पीठ काढून घ्या. नंतर त्यात एक उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करा.

ज्वारीचे आप्पे करा फक्त १५ मिनिटांत, गुबगुबीत ग्लूटन फ्री आप्पे-नाश्त्याला बेस्ट-शाळेच्या डब्यासाठीही मस्त

मिक्स केल्यानंतर गोळा तयार करा. एक बटर पेपर घ्या, त्यावर ब्रशने तेल किंवा तूप लावा. दुसरीकडे कढईत तेल ओतून गरम करण्यासाठी ठेवा. बटर पेपरवर गोळा ठेवून पुरी लाटून घ्या, व गरम तेलात पुऱ्या सोडून तळून घ्या. अशा प्रकारे साबुदाणा - बटाट्याच्या खमंग पुऱ्या खाण्यासाठी रेडी. आपण या पुऱ्या दहीसोबत खाऊ शकता. 

Web Title: Sabudana poori recipe | upvas recipes for fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.