Join us

फक्त ४ टोमॅटोंचे करा १०० पापड, पाहा टोमॅटो पापडाची रेसिपी; यंदा वाळवणात हे पापड हवेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2025 16:47 IST

Summer Special Recipe For Making Sabudana Tomato Papad: यावर्षी उन्हाळ्यात या रेसिपीनुसार टाेमॅटोचे पापड नक्की करून पाहा..(how to make sabudana tomato papad in summer?)

ठळक मुद्देही रेसिपी अगदी सोपी आहे आणि विशेष म्हणजे खूपच कमी साहित्य वापरून तुम्हाला भरपूर पापड करता येतात.

उन्हाळ्याचे दिवस आता जवळ आले आहेत. उन्हाळा म्हटलं की हमखास आठवण येते ती वाळवणाच्या वेगवेगळ्या पदार्थांची. महाशिवरात्र झाली की त्यानंतर वाळवणाचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे ऊन तापायला लागलं की तुम्हीसुद्धा यावेळी तुमच्या वाळवणाच्या पदार्थांच्या यादीमध्ये टोमॅटो पापडांची ही रेसिपी लिहून टाका (sabudana tomato papad recipe). कारण ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि विशेष म्हणजे खूपच कमी साहित्य वापरून तुम्हाला भरपूर पापड करता येतात. त्यासाठी नेमकं काय करायचं ते आता पाहा..(Summer Special Recipe For Making Sabudana Tomato Papad)

 

टोमॅटोचे पापड कसे तयार करायचे?

टोमॅटोचे पापड कसे तयार करायचे याविषयीची रेसिपी Amma Ki Thaali या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

यासाठी सगळ्यात आधी तर मोठ्या आकाराचे ४ टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्या.

हिरव्यागार ताज्या मटारचा सिझन संपत आला! लवकर पाहा मटार वर्षभर टिकवून ठेवण्याच्या सोप्या ट्रिक्स

आता टोमॅटोची प्युरी गाळणीतून गाळून घ्या आणि टोमॅटोची सालं, बिया बाजूला काढून टाका.

मिक्सरच्या भांड्यात अर्धा ते पाऊण कप साबुदाणा घाला आणि तो मिक्सरमधून चांगला बारीक करून घ्या.

 

यानंतर गॅसवर एक पातेले गरम करायला ठेवा. त्या पातेल्यामध्ये ४ कप पाणी घाला. आता पाणी थोडे गरम झाले की त्यात टोमॅटोची प्युरी आणि साबुदाण्याचे पीठ घाला. याचवेळी त्यात लाल तिखट, मीठ, जिरेपूड आणि कोथिंबीरसुद्धा घालावी. 

स्वयंपाक घरात छोटेसे तरी स्नेक प्लांट ठेवाच, कारण..... वाचा किचनमध्ये स्नेक प्लांट ठेवण्याचे ५ फायदे

सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि काही मिनिटे गॅसवर शिजू द्या. हे मिश्रण शिजत असताना ते वारंवार हलवत राहावं जेणेकरून त्यात गाठी होणार नाहीत.

जेव्हा हे मिश्रण थोडं घट्ट झाल्यासारखं जाणवेल आणि साबुदाणा व्यवस्थित शिजेल तेव्हा गॅस बंद करा. काही मिनिटे मिश्रण तसेच ठेवून थोडे कोमट होऊ द्या. 

तोपर्यंत एक प्लास्टिकचा कपडा गच्चीवर पसरवून ठेवा आणि त्याला थोडेसे तेल लावून घ्या. यानंतर तयार केलेल्या पिठाचे पळीने पापड घाला. हा पापड तळताना खूप फुलतो. त्यामुळे त्याचा आकार लहानच ठेवावा. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीसमर स्पेशल