Join us  

श्रावण स्पेशल : बटाटा न घालता करता येतो क्रिस्पी साबुदाणा वडा, उपवासाला चमचमीत बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2023 1:27 PM

Sabudana Vada Recipe | How to make Sabudana Vada without potato साबुदाणा वड्यात बटाटा उकडून घातलाच पाहिजे असा काही नियम नाही, न घालताही साबुदाणा वडा होईल कुरकुरीत

उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते साबुदाणा. साबुदाणा खाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. काही जण तर खास उपवासाच्या पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी उपवास करतात. साबुदाण्याचे अनेक प्रकार केले जातात. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, साबुदाण्याचे वडे. या सगळ्यात साबुदाण्याचे वडे हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. साबुदाणा वडा करण्यासाठी योग्य प्रमाणात साहित्यांचा वापर केला जातो. अनकेदा साबुदाणा वडा फसतो.

आज आपण बटाटा न घालता साबुदाणा वडा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. काही लोकं वजन वाढणे किंवा इतर कारणांमुळे बटाटे खाणे टाळतात. किंवा काही लोकं बटाटे नसल्यामुळे साबुदाणा वडा तयार करत नाही. त्यामुळे बटाट्याशिवाय साबुदाणा वडा कसा तयार करायचा हे पाहूयात(Sabudana Vada Recipe | How to make Sabudana Vada without potato).

साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य

साबुदाणा

काळी मिरी पावडर

जिरे पावडर

अर्धी वाटी खोबरं - एक चमचा तेल, ५ मिनिटात करा खोबऱ्याची चटकदार चटणी

मीठ

हिरवी मिरची - आलं पेस्ट

कोथिंबीर

कडीपत्ता

वरीच्या तांदुळाचे पीठ

शेंगदाण्याचं कूट

कृती

एका वाटीत एक कप साबुदाणा घ्या. त्यात एक कप पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या. आता त्यातून पाणी काढून घ्या. व त्यात एक कप ताक मिसळून ३ तासांसाठी भिजत ठेवा. किंवा रात्रभर देखील आपण साबुदाणा भिजत ठेऊ शकता.

साबुदाणा भिजल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक चमचा काळी मिरी पावडर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ, एक चमचा हिरवी मिरची - आलं पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर - कडीपत्ता, २ चमचे वरीच्या तांदुळाचे पीठ, २ चमचे शेंगदाण्याचं कूट व अर्धा कप पाणी घालून साहित्य एकजीव करा.

१ कप मूगडाळीचे करा चविष्ट आप्पे, सोडा न घालताही आप्पे फुगतील टम्म

ज्याप्रमाणे आपण साबुदाणा वड्यासाठी पीठ तयार करतो, त्याच प्रमाणे पीठ तयार करायचे आहे. दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार मिश्रणाचे वडे सोडून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे बटाटा न घालता क्रिस्पी साबुदाणा वडा खाण्यासाठी तयार. आपण हे वडे हिरवी चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स