Join us  

साबुदाणा वडे करताना पीठात १ पदार्थ घाला, वडे फुटणार नाहीत -तेलही पिणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 11:13 AM

Sabudana Vada Recipe : परफेक्ट साबुदाणे वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही साबुदाणे वडे कसे भिजवता  हे सुद्धा महत्वाचं असतं.

उपवास असो किंवा नको साबुदाणे वडे ही अनेकांची पहिली पसंती असते.  साबुदाणे वडे बनवायला सोपे आणि खायला रूचकर, चविष्ट लागतात. साबुदाणे व्यवस्थित बनत नाही, तेलात फुटतात अशी अनेकांची तक्रार असते. साबुदाणे बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Crispy Sabudana Vada Recipe) जेणेकरून कुरकुरीत, क्रिस्पी वडे घरीच बनून तयार होतील. परफेक्ट साबुदाणे वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही साबुदाणे वडे कसे भिजवता हे सुद्धा महत्वाचं असतं. (How to make sabudana vada at home)

साहित्य

उकडलेले बटाटे - ६ ते ७

साबुदाणे-  १ मोठा वाडगा

सैंधव मीठ - २ टिस्पून

दाण्याचे कूट - ४ ते ५ टिस्पून

लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून

कोथिंबीर- १ टेबलस्पून

हिरवी मिरचीची पेस्ट - १ टिस्पून

लिंबाचा रस - ३ ते ४ चमचे

तळण्यासाठी तेल

कृती

१) साबुदाणे वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी साबुदाणे रात्रभर शिजवत ठेवा. जर तुम्हाला रात्रभर  भिजवायला वेळ नसेल तर  वडे बनवण्याच्या ३ ते ४ तास आधी  साबुदाणे भिजवायला ठेवा. 

२) एका ताटात साबुदाणे,  उकडलेले बटाटे, दाण्याचे कुट, मिरची, जीरं आणि  सुकलेला कढीपत्ता घाला,  त्यात मीठ आणि लिंबाचा रस घाला. 

३) हे सर्व पदार्थ घातल्यानंतर हे पीठ व्यवस्थित मिळून घ्या आणि हाताला तेल लावून गोळे बनवा. गोळे थोडे चपटे करा. तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर  त्यात वडे गोल्डन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्या. 

साबुदाणा वडा बिघडू नये यासाठी टिप्स

१) साबुदाणा ६ ते ७ तास भिजवा. भिजवल्यानंतर बोटाने स्मॅश करून पाहा.  साबुदाणे व्यवस्थित दाबले जात असतील तर त्यात उकडलेले बटाटे मिसळा. 

चटकमटक खायचं तर करा कमी तेलातली खमंग मूगभजी, फार तेल न वापरताही भजी होतील कुरकुरीत

2) बटाटे उकडल्यानंतर ते चिकट राहणार नाहीत याची काळजी घ्या. बटाट्यांमध्ये पाणी असेल आणि त्याची सालं काढून कुस्करले तर त्याला चिकटपणा येतो आणि वडे तेलात फुटतात. म्हणून बटाटे उकडल्यानंतर लगेच मॅश न करता थोडावेळ वर तसेच ठेवा त्यानंतर स्मॅश करा. 

विकतसारखं घट्ट दही घरीच करा; १ गोष्ट मिसळा-वड्या पडतील असं दही बनेल

३) तेल पूर्ण गरम झाल्याशिवाय वडे तेलात सोडू नका. अन्यथा वड्यांच्या आत तेल शिरतं आणि ते कुरकुरीत होत नाहीत.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स