Lokmat Sakhi >Food > साबुदाणे वडे फुगतच नाही? फार तेल पितात? एक सिंपल ट्रिक, हॉटेलस्टाईल साबुदाणा वडे करण्याची सोपी कृती

साबुदाणे वडे फुगतच नाही? फार तेल पितात? एक सिंपल ट्रिक, हॉटेलस्टाईल साबुदाणा वडे करण्याची सोपी कृती

Sabudana Vada Recipe (Traditional Fasting Recipe) : बाहेरून कुरकुरीत-आतून मऊ; टम्म फुगलेले साबुदाणे वडे कसे करायचेत? पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 01:24 PM2024-02-20T13:24:32+5:302024-02-20T13:25:12+5:30

Sabudana Vada Recipe (Traditional Fasting Recipe) : बाहेरून कुरकुरीत-आतून मऊ; टम्म फुगलेले साबुदाणे वडे कसे करायचेत? पाहा..

Sabudana Vada Recipe (Traditional Fasting Recipe) | साबुदाणे वडे फुगतच नाही? फार तेल पितात? एक सिंपल ट्रिक, हॉटेलस्टाईल साबुदाणा वडे करण्याची सोपी कृती

साबुदाणे वडे फुगतच नाही? फार तेल पितात? एक सिंपल ट्रिक, हॉटेलस्टाईल साबुदाणा वडे करण्याची सोपी कृती

उपास असो किंवा सहज खाण्याची इच्छा, साबुदाण्याचे पदार्थ कोणाला नाही आवडत. साबुदाण्याची खिचडी, खीर किंवा साबुदाण्याचे वडे आपण आवर्जून आणि आवडीने खातो. पण बऱ्याचदा साबुदाण्याचे वडे कुरकुरीत किंवा हॉटेलस्टाईल तयार होत नाही. किंवा तळताना वडे जास्त तेल पितात, ज्यामुळे वडे जास्त फुलतही नाही. अनेकदा साबुदाणा नीट भिजत न घातल्यामुळे वडे व्यवस्थित तयार होत नाही (Cooking Tips).

जर आपले घरगुती वडे स्वादिष्ट आणि कुरकुरीत तयार होत नसतील तर, या रेसिपीला फॉलो करून पाहा (Sabudana Vada). स्टेप-बाय-स्टेप ही रेसिपी फॉलो केल्याने साबुदाण्याचे वडे चविष्ट आणि क्रिस्पी  तयार होतील. शिवाय परफेक्ट तेल न पिता फुगतील(Sabudana Vada Recipe-Traditional Fasting Recipe).

हॉटेलस्टाईल साबुदाणा वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

साबुदाणे

बटाटे

शेंगदाण्याचं कूट

हिरवी मिरची

कोथिंबीर

कपभर बेसन-२ चमचे रवा, कटोरी ढोकळा कधी करून पाहिलं आहे का? स्पॉन्जी ढोकळा; चवीला जबरदस्त

सैंधव मीठ

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप साबुदाणे घ्या, त्यात पाणी घालून धुवून घ्या. त्यात पुन्हा एक पाणी घालून त्यावर झाकण ठेवा, व ६ ते ७ तासांसाठी भिजत ठेवा. दुसऱ्या बाऊलमध्ये ३ ते ४ उकडलेले बटाटे घ्या. त्यात एक कप भिजवलेले साबुदाणे, एक कप शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार सैंधव मीठ घालून हाताने साहित्य मिक्स करा.

घावन करायला जावं तर ते तव्याला चिकटतं? उलटताना तुटतं? पाहा पारंपरिक कोकणी घावन रेसिपी

दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. हाताला थोडे तेल लावा, थोडं मिश्रण घेऊन गोल आकार द्या. गरम तेलात वडे सोडून सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत साबुदाणे वडे खाण्यासाठी रेडी. आपण हे वडे शेंगदाण्याची चटणी किंवा दहीसोबत खाऊ शकता. 

Web Title: Sabudana Vada Recipe (Traditional Fasting Recipe)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.