वरण- भात, भाजी- पोळी हा अगदी रोजचाच स्वयंपाक. तो करता करता कित्येक महिलांना अनेक वेगवेगळ्या कामांकडेही लक्ष द्यावं लागतं. ती वेळ सकाळची असेल तर मग महिलांच्या मागे असणारी कामाची गडबड विचारूच नका. एकाच वेळी अनेक विचार डोक्यात असतात. त्यामुळे मग कधीतरी भाजी करताना ती एकदा गॅसवर ठेवून दिली की नेमकं तिच्याकडे दुर्लक्ष होतं आणि भाजी करपायला लागते. करपणाऱ्या भाजीचा वास यायला लागला की मग आपलं लक्ष तिच्याकडे जातं आणि मग एकदम आता काय करावं म्हणून गोंधळून गेल्यासारखं होतं.. म्हणूनच असं काही तुमच्या बाबतीत झालं तर अजिबात गोंधळून जाऊ नका, लगेच दुसरी भाजी करावी लागेल याचं टेन्शनही घेऊ नका (Simple Trick To Fix The Burnt Vegetable).. फक्त पुढे सुचविण्यात आलेली ही एक सोपी गोष्ट करून पाहा (Sabzi jal jaaye to kya kare?).. भाजी करपलेली होती हे सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही.(what to do if sabji get burnt?)
भाजी करपली तर काय करावं?
भाजी करपली की मग तिला जळकट वास लागतो आणि ती खाल्ली जात नाही. भाजी तर वाया जातेच पण ती करताना त्यात घातलेले मसाले, तेल हे सगळंही वाया जातं. त्यामुळे ती टाकून देण्याचीही इच्छा होत नाही.
चैत्रगौर हळदीकुंकू : पारंपरिक लूक करून झटपट तयार होण्यासाठी खास टिप्स- सगळ्यांपेक्षा सुंदर दिसाल
म्हणूनच करपलेली भाजी पुन्हा उपयोगात आणण्यासाठी आणि तिला खाण्यायोग्य चवदार करण्यासाठी ही एक मस्त ट्रिक करून बघा. हा उपाय manjumittal.homehacks या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुमची भाजी जेवढी असेल त्या प्रमाणानुसार एका वाटीमध्ये दही घ्या. त्या दह्यामध्ये थोडं हिंग घाला. तुम्ही त्या दह्यामध्ये जिरेपूड धने पूड आणि थोडा किचन किंग मसाला किंवा चाट मसाला घातला तरी चालेल.
भन्नाट देसी जुगाड- सुईमध्ये दोरा ओवण्याची सगळ्यात सोपी ट्रिक, एक टुथब्रश घ्या आणि......
दही व्यवस्थित फेटून घ्या आणि मग हे दही तुमच्या करपलेल्या भाजीमध्ये घाला. पुन्हा एकदा सगळी भाजी व्यवस्थित हलवून घ्या. जर भाजी जास्तच करपली असेल तर जेवढी भाजी चांगली आहे ती एका वेगळ्या कढईमध्ये काढून घ्या आणि मग ती दह्यात कालवून घ्या. हा उपाय केल्यामुळे भाजीचा करपलेला वास पूर्णपणे निघून जाईल आणि ती खाण्यायोग्य होईल.