Lokmat Sakhi >Food > सचिन तेंडुलकर करतो तशी ‘स्पेशल आंबा कुल्फी’ यंदा नक्की करुन पाहा, अशी कुल्फी तुम्ही खाल्ली नसेल...

सचिन तेंडुलकर करतो तशी ‘स्पेशल आंबा कुल्फी’ यंदा नक्की करुन पाहा, अशी कुल्फी तुम्ही खाल्ली नसेल...

Sachin Tendulkar turns chef, makes Mango Kulfi for family : Mango Kulfi Recipe : आंबा कुल्फीचे प्रकार अनेक पण हा अनोखा आणि सचिन तेंडुलकरलाही आवडणारा कुल्फीचा प्रकार नक्की करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2023 07:55 AM2023-04-22T07:55:53+5:302023-04-22T07:55:53+5:30

Sachin Tendulkar turns chef, makes Mango Kulfi for family : Mango Kulfi Recipe : आंबा कुल्फीचे प्रकार अनेक पण हा अनोखा आणि सचिन तेंडुलकरलाही आवडणारा कुल्फीचा प्रकार नक्की करुन पाहा.

Sachin Tendulkar prepares Mango Kulfi for family | सचिन तेंडुलकर करतो तशी ‘स्पेशल आंबा कुल्फी’ यंदा नक्की करुन पाहा, अशी कुल्फी तुम्ही खाल्ली नसेल...

सचिन तेंडुलकर करतो तशी ‘स्पेशल आंबा कुल्फी’ यंदा नक्की करुन पाहा, अशी कुल्फी तुम्ही खाल्ली नसेल...

'आंबा' हे असे एकमेव फळ आहे जे वर्षातून एकदाच येते. त्यामुळे आपण या आंब्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. उन्हाळ्याचा सीजन सुरु झाला की आपण कधी एकदा आंबा खातो असे प्रत्येकाला होत असते. उन्हाळ्यात येणाऱ्या या आंब्याचे आपण अनेक पदार्थ बनवून खातो. आंब्याची आईस्क्रीम, कुल्फी, आंब्याचा आमरस, केक, फिरनी अशा असंख्य पदार्थांची रेलचेल प्रत्येक घराघरामध्ये दिसून येते. उन्हाळा म्हटलं की आपल्याला काहीतरी गारेगार खावेसे वाटत असते. वाढत्या उष्णतेमुळे शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण उन्हाळ्यात अनेक थंडगार पदार्थ खात असतो.

उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम, कुल्फी असे पदार्थ घरात तयार केले नाही, असे शक्यच नाही. कारण उन्हाळ्यात सहसा प्रत्येक घरात सिजनल फळांचे जसे की कलिंगडाचे, आंब्याचे आईस्क्रीम बनवणे ही एक प्रथाच बनली आहे. उन्हाळयात आंब्याचा तयार केला जाणारा एक कॉमन पदार्थ म्हणजे मँगो कुल्फी. आयपीएलचा सिझन सुरु आहे त्यामुळे यंदा सचिन तेंडुलकर बिझी असला तरी मागच्या वर्षी त्यानं या खास आंबा कुल्फीचा व्हिडिओ केला होता. स्वत: त्यानं ही कुल्फी केली होती. तो स्वयंपाक उत्तम करतोच. तर यंदा आपणही ही कुल्फी करुन पाहू. मँगो कुल्फी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते. यंदाच्या उन्हाळ्यात आंब्याची झटपट तयार होणारी मँगो कुल्फी नक्की ट्राय करा(Sachin Tendulkar turns chef, makes Mango Kulfi for family : Mango Kulfi Recipe).

साहित्य :- 

१. पिकलेले आंबे - ४
२. दूध - अर्धा लिटर 
३. साखर - १५० ग्रॅम 
४. काजूचे बारीक काप - ३ ते ४ टेबलस्पून 

कृती :- 

१. सर्वप्रथम पिकलेला आंबा घेऊन तो देठाकडील भागावर कापून घ्यावा. 
२. आंबा देठाकडील भागात कापून घेतल्याने चमच्याच्या मदतीने त्यांतील गर काढून घ्यावा.
३. आंब्यातील सगळा गर आणि आतील बाटा काढून घ्यावा. 
४. त्यानंतर एका पॅनमध्ये दूध घेऊन त्यात साखर घालून हे दूध थोडे आटून घट्ट होईपर्यंत मंद आचेवर गरम करत ठेवावे. मध्ये मध्ये हे दूध चमच्याने हलवत रहावे. 

शाही गुलकंद फिरनी, भर उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा पारंपरिक पदार्थ, बनवायला सोपा चवीला उत्तम...

अस्सल देवगड 'हापूस' कसा ओळखाल? ६ टिप्स, पैसे मोजताय तर घ्या अस्सल आंबा...

५. दूध आटवून घेतल्यानंतर हे दूध गर काढून घेतलेल्या आंब्यात ओतावे. 
६. आता आंबा कापताना आंब्याचे जे गोल देट कापून घेतले होते ते अलगद यावर ठेवावे. आणि हे आंबे एका बाऊलमध्ये उभे राहतील असे ठेवून हा बाऊल फ्रिजरमध्ये ठेवून द्यावा. 
७. ही मँगो कुल्फी ७ ते ८ तासांसाठी फ्रिजरमध्ये ठेवावी. 
८. मँगो कुल्फी ७ ते ८ तासांसाठी रेफ्रिजरेट करुन घेतल्यानंतर बाहेर काढून त्या आंब्यावरची साल काढून घ्यावी. 

९. आंब्यावरची साल काढून घेतल्यानंतर या मँगो कुल्फीचे गोल चकती सारखे तुकडे कापून घ्यावेत. 
१०. या गोल चकती सारखे तुकडे कापून घेतल्यानंतर ते एका डिशमध्ये ठेवून सर्व्ह करताना त्यावर काजूचे किंवा आपल्या आवडत्या ड्राय फ्रूट्सचे काप घालून ही मँगो कुल्फी खाण्यासाठी सर्व्ह करावी.   

आंब्याच्या मौसमात आमरस खाण्याची चंगळ, पण घाईच्यावेळी कसा कराल झटपट आमरस?

अस्सल मँगो कुल्फी खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Sachin Tendulkar prepares Mango Kulfi for family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.