दही (Curd) एक उत्तम फर्मेंडेट आणि प्रोबायोटीक फूड आहे. यामुळे तुमचे पोट, छोटे आतडे, मोठे आतडे आणि पचनाच्या समस्या सुधारण्यास मदत होते. पण तुम्हाला माहीत आहे का दही लावण्यात छोटी चूक केल्यास तुमच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. सद्गुरूंनी सांगितलं की दही लावताना तुम्ही कोणती चूक करू नये. (Sadhguru Shared Right Time To Set Curd And Mistakes To Avoid To Get Probiotics Benefits)
एक इंस्टाग्राम रील सद्गुरू आणि युसीएलए ब्रेन गट मायक्रो बायोम सेंटरचे फाऊंडींग डायरेक्ट फर्मेंटेंड फूडबाबत अधिक माहिती देत आहेत. या दरम्यान सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगतिले की कोणत्या वातावरणात किती वेळ दही लावायला हवं आणि दही खाण्याची योग्य पद्धत समजून घ्यायला हवी.
भात कमी खाता तरी पोट सुटलंय? अनिरूद्धाचार्य सांगतात 'ही' डाळ खा, वजन भराभर होईल कमी
अभ्यासातून समोर आले की वेगवेगळ्या प्रकारचे फर्मेंडेट फूड खाल्ल्यानं पचनाचे विकार होत नाहीत आणि ते इंफ्लामेटरी मार्कर कमी असतात. त्यांनी प्लांट बेस्ड डाएटबरोबर वेगवेगळे फर्मेंटेंड फूड खाण्याचा सल्ला दिला आहे. आहारात फर्मेंटेड फूड्सचा समावेश केल्यास त्यात आवश्यक मायक्रोब्स असतात.
दही जास्तवेळ फर्मेंट करू नये
सद्गुरू सांगतात की फर्मेंटेशन जितका वेळ कराल तितकंच शरीरासाठी फायदेशीर ठरतं. फर्मेंटेशन कंट्रोलमध्ये करायला हवं. जर तुम्ही लिमिटपेक्षा जास्त फर्मेंट केलं तर तुमचे गट मायक्रोब्स सपोर्ट करण्याऐवजी स्वत: बायोम बनवतील. ज्यामुळे छोट्या आतड्यांचे आरोग्य खराब होऊ लागेल.
दही लावण्याची योग्य पद्धत
दही फर्मेंट करताना वेळेकडे लक्ष द्यायला हवं. जितका जास्त वेळ तुम्ही दही फर्मेंट होऊ द्याल. आतडे, पोट, डायजेशन खराब होऊ शकते. दही लावण्याची योग्य पद्धत पाहायला हवी. दही जास्त वेळ फर्मेंट करायला ठेवल्यास त्याची चव बिघडू शकते.दही गोड लागायला हवं हलका आंबटपणा चालू शकतो.
केस वाढतच नाहीत-नुसते गळतात? घरीच २ चमचे तांदळाचा हा उपाय करा, लांब-दाट होतील केस
सद्गुरू सांगतात की जास्त आंबट दही खाण्यालायक नसते. सद्गुरूंनी वेगवेगळ्या वातावरणात दही लावण्याच्या वेगवेगळ्या वेळा सांगितल्या आहेत. ऊन्हाळ्यात फक्त 4 ते 5 तासच दही लावावं. तर थंडीच्या दिवसांत तुम्ही दही लावण्यासाठी रात्रभर तसंच ठेवू शकता.
दही काढण्याची योग्य पद्धत
दही लावण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. सद्गुरू सांगतात की दही मधून तोडण्याऐवजी कडेकडेने तोडायला हवं. तुम्ही दही कोणत्या पद्धतीनं खाताय ते समजून घ्या. जितकं गरजेचं असेल तर तितकंच दही खा. जास्त प्रमाणात दही खाणं टाळावं.