Lokmat Sakhi >Food > मस्त फुलणाऱ्या हलक्या खुसखुशीत साबुदाणा-बटाटा पापड्या; करायला सोप्या-झटपट रेसिपी

मस्त फुलणाऱ्या हलक्या खुसखुशीत साबुदाणा-बटाटा पापड्या; करायला सोप्या-झटपट रेसिपी

साबुदाणा आणि बटाटा यांपासून अगदी कमी वेळात होणाऱ्या पापड्या चवीला जितक्या छान लागतात तितक्याच त्या करायलाही सोप्या असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 11:14 AM2022-04-13T11:14:06+5:302022-04-13T11:25:10+5:30

साबुदाणा आणि बटाटा यांपासून अगदी कमी वेळात होणाऱ्या पापड्या चवीला जितक्या छान लागतात तितक्याच त्या करायलाही सोप्या असतात.

Sago-potato double-flowered papadas; Try the crunchy simple recipe | मस्त फुलणाऱ्या हलक्या खुसखुशीत साबुदाणा-बटाटा पापड्या; करायला सोप्या-झटपट रेसिपी

मस्त फुलणाऱ्या हलक्या खुसखुशीत साबुदाणा-बटाटा पापड्या; करायला सोप्या-झटपट रेसिपी

Highlightsबाहेरचे तळकट पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी वाळवण करुन ते तळून खाल्लेले केव्हाही चांगले नाही का..

उन्हाळा म्हटला की वाळवणं आलीच. पूर्वी केली जायची तशी किलोंमध्ये आता वाळवणं केली जात नसली तरी सुट्टीच्या दिवशी झटपट होणाऱ्या आणि वर्षभर टिकणाऱ्या काही सोप्या रेसिपी आपण नक्की करु शकतो. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे चटपटीत पदार्थ केले की बाहेरचे चिप्स किंवा इतर तळणीचे पदार्थ खाल्ले जात नाहीत. कमीत कमी कष्टात आणि तरीही स्वच्छतेत केले जाणारे हे वाळवणाचे पदार्थ कधीही तब्येतीला चांगले. त्यातही आपल्याकडे चतुर्थी, एकादशी किंवा अगदी मंगळवार, शनिवार असे उपवास असतील तर उपवासाचे वाळवण तर आवर्जून लागते. साबुदाणा आणि बटाटा यांपासून अगदी कमी वेळात होणाऱ्या पापड्या चवीला जितक्या छान लागतात तितक्याच त्या करायलाही सोप्या असतात. आपल्या घराला एखादी गॅलरी असेल तर ठिक नाहीतर सोसायटीच्या टेरेसवर आपण हे वाळवण नक्कीच करु शकतो. सूर्यप्रकाशात मोफत वाळवून मिळणाऱ्या या पापड्या एकदा नक्की करुन पाहा. तळल्यावर त्या इतक्या छान फुलतात की पाहून तुम्हीही खूश व्हाल.

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य - 

१. साबुदाणा - २ वाट्या 
२. बटाटा - अर्धा किलो
३. मीठ- चवीनुसार 
४. तिखट किंवा मिरच्या - आवडीनुसार 
५. जीरे - १ चमचा 

(Image : Google)
(Image : Google)

कृती - 

१. साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालावा.

२. बटाटे स्वच्छ धुवून साली काढून त्याचा किस करुन घ्यावा. हा किस शक्यतो पाण्यात ठेवावा म्हणजे काळा पडत नाही. 

३. साबुदाणा भिजल्यावर जितका झाला असेल तितकेच पाणी एका पातेल्यात घेऊन ते गॅसवर ठेवावे.

४. पाण्यात साबुदाणा घालून तो शिजवावा, सतत हलवत राहावा म्हणजे खाली चिकटत नाही. 

५. यामध्य़े चवीनुसार मीठ, तिखट किंवा मिरचीचा ठेचा आणि जीरे घालावे.

६. साबुदाणा थोडा शिजत आल्यावर त्यामध्ये बटाट्याचा किस घालावा.

७. मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर आवश्यकतेनुसार वरुन पाणी घालायला हरकत नाही. मात्र हे मिश्रण बारीक गॅसवर ठेवून सतत हलवत राहावे म्हणजे पातेल्याला खाली चिकटत नाही. 

८. गरम असतानाच प्लास्टीकच्या कागदावर गोल पळीने शक्या तितक्या पातळ पापड्या घालाव्यात. 
 

Web Title: Sago-potato double-flowered papadas; Try the crunchy simple recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.