Join us

सलमान खानने केले कांद्याचे इन्स्टंट लोणचे, भाईजान सांगतोय लोणच्याची रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2023 13:54 IST

Salman Khan Makes INSTANT Raw Onion Pickle सलमान खानला स्वयंपाक करता येतो का? लोणच्याची रेसिपी पाहा, त्यानेच शेअर केली आहे.

बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान, हा मल्टीटॅलेण्टेड अभिनेता आहे. तो अभिनय क्षेत्रातला बिग बॉस तर आहेच, यासह त्याला सिंगिंग, पेंटिंग आणि सायकलिंगची देखील आवड आहे. पण आपण कधी त्याला जेवण करताना पाहिलं आहे का? आश्चर्य वाटलं ना? सलमान आणि कुकिंग? हे कसं शक्य आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी कांद्याचं इन्स्टंट लोणचं तयार केलं आहे. हे लोणचं कमी साहित्यात गॅसचं वापर न करता झटपट तयार होते. तुम्हाला जर जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी हटके डिश खायची असेल तर, हा पदार्थ नक्की ट्राय करून पाहा(Salman Khan Makes INSTANT Raw Onion Pickle).

कांद्याचं इन्स्टंट लोणचं तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

छोट्या आकाराचे कांदे

बडीशेप

कलौंजी

लाल तिखट

करा ‘कुरकुरीत कारली’; पदार्थच असा भारी की कारल्याची भाजीही होईल आवडती!

मीठ

मोहरीचं तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये छोट्या आकाराचे ४ ते ५ कांदे घ्या. कांद्याला चिरण्याची गरज नाही, हवं असल्यास आपण त्याचे २ फोड करू शकता. त्यात एक टेबलस्पून बडीशेप, एक टेबलस्पून कलौंजी, चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, व २ टेबलस्पून मोहरीचे तेल घालून साहित्य एकजीव करा.

प्रवासात ‘रेल्वे कटलेट’ खायची मजाच भारी! घ्या रेल्वे कटलेटची सोपी-झटपट रेसिपी

अशा प्रकारे जेवताना तोंडी लावण्यासाठी कांद्याचं इन्स्टंट लोणचं खाण्यासाठी रेडी. आपण हे लोणचं चपाती किंवा भातासह देखील खाऊ शकता. 

टॅग्स :सलमान खानअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स