Lokmat Sakhi >Food > समोशासोबत झणझणीत तर्री आणि भात! बघा औरंगाबादची स्पेशल डिश- समोसा राइस, टेस्ट अशी भारी की..

समोशासोबत झणझणीत तर्री आणि भात! बघा औरंगाबादची स्पेशल डिश- समोसा राइस, टेस्ट अशी भारी की..

Food And Recipe: समोसा, भात आणि झणझणीत तर्री (Samosa Rice) हे काॅम्बिनेशन ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी चवीला मात्र जबरदस्त टेस्टी आहे.. म्हणूनच औरंगाबादला (special dishes of Aurangabad) आल्यावर हा स्पेशल पदार्थ खायला विसरू नका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 05:07 PM2022-08-22T17:07:38+5:302022-08-22T17:09:30+5:30

Food And Recipe: समोसा, भात आणि झणझणीत तर्री (Samosa Rice) हे काॅम्बिनेशन ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी चवीला मात्र जबरदस्त टेस्टी आहे.. म्हणूनच औरंगाबादला (special dishes of Aurangabad) आल्यावर हा स्पेशल पदार्थ खायला विसरू नका.

Samosa Rice- Special dish of Aurangabad, Famous street food in Aurangabad  | समोशासोबत झणझणीत तर्री आणि भात! बघा औरंगाबादची स्पेशल डिश- समोसा राइस, टेस्ट अशी भारी की..

समोशासोबत झणझणीत तर्री आणि भात! बघा औरंगाबादची स्पेशल डिश- समोसा राइस, टेस्ट अशी भारी की..

Highlights२५ ते ३० रुपयांना मिळणारा एक प्लेट समोसा राईस घेतला तर अगदी भरपेट नाश्ता होतो हे नक्की. शिवाय चव एकदम भारी.

मराठवाड्याची राजधानी असणारं औरंगाबाद (Aurangabadi Food) हे शहर पर्यटनाच्या बाबतीतही अतिशय समृद्ध आहे. त्यामुळेच तर शहराच्या जवळ असणारी वेरुळ लेणी, दौलताबाद, खुलताबाद, बिवी- का- मकबरा, पाणचक्की, अजिंठा लेणी (Ajanta and Ellora Caves) अशी काही ठिकाणं पाहण्यासाठी या शहरात भारतीय तसेच परदेशी पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. आता या शहरात आल्यावर स्थानिक औरंगाबादकरांप्रमाणेच पर्यटकांची पावलंही समोसा राईस (Samosa Rice) या भन्नाट पदार्थाची चव चाखायला सिडको भागातील त्रिमुर्ती आप्पा नाश्ता सेंटरकडे वळतात. औरंगाबादमध्ये आल्यावर खवय्यांनी जे काही पदार्थ हमखास चाखून बघायला पाहिजेत (Famous street food in Aurangabad ), त्या पदार्थांमध्ये आता समोसा राईसचं नाव आवर्जून घेतलं जातं. 

 

साधारण २० वर्षांपुर्वी दादासाहेब घोडे, अजिनाथ घोडे आणि आप्पासाहेब घोडे या भावंडांनी सिडकोमध्ये छोटीशी टपरी सुरू केली होती. ग्राहकांच्या मागणीवरूनच या भावंडांना एक भन्नाट आयडिया सुचली आणि त्यातूनच समोसा, भात आणि तर्री असं भन्नाट कॉम्बिनेशन असणाऱ्या समाेसा राईसचा जन्म झाला. २५ ते ३० रुपयांना मिळणारा एक प्लेट समोसा राईस घेतला तर अगदी भरपेट नाश्ता होतो हे नक्की. शिवाय चव एकदम भारी. त्यामुळे अप्पांकडे खवय्यांची कायम गर्दी असते. कॉलेजचे मुलं जसे इथे येतात, तसेच अगदी कुटूंबच्या कुटूंब येऊनही समोसा राईसचा आस्वाद घेतं.. रविवारी तर पार्सल नेणाऱ्यांची संख्या विशेष वाढलेली असते.

 

कसा असतो समोसा राईस?
- या पदार्थासाठी जो भात केला जातो तो फोडणी देऊन मसालेदार केला जातो.
- शिवाय तर्री लसूण, आलं, कांदा, टोमॅटो घालून तयार केली जाते. लालसर दिसणारी ही तर्री अतिशय खमंग आणि मराठवाड्यातला अस्सल झणझणीतपणा जपणारी आहे.

देसी गर्लचे 'देसी मॉम' स्टाइल प्रेम, प्रियांकाच्या बाळाच्या पायात काळे मणी, नेटिझन्स म्हणाले....
- हा राईस सर्व्ह करताना सुरुवातीला मसालेभात एका मोठ्या बाऊलमध्ये वाढला जातो. त्यावर चांगली वाटीभर तर्री टाकली जाते. त्यावर समोस्याचे तुकडे करून टाकले जातात. वरतून कांदा- कोथिंबीर यांची मस्त पेरणी आणि त्यावर पिळलेली लिंबाची फोड.
- अशी मस्त सजवलेली डिश जेव्हा आपल्यासमोर येते, तेव्हा ती व्यवस्थित कालवून घ्यायची आणि मग समोसाराईसचा आस्वाद घ्यायचा. तर्रीची एक वाटी सोबत ठेवलेली असतेच. गरज पडेल तेव्हा आणखी तर्री ओतून घ्यायची आणि या चटकदार पदार्थाचा आस्वाद घ्यायचा.. 

 

Web Title: Samosa Rice- Special dish of Aurangabad, Famous street food in Aurangabad 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.