Lokmat Sakhi >Food > करा अस्सल मराठी चवीची सांडग्यांची झणझणीत आमटी, टेस्ट अशी की तोंडाला चवच येईल

करा अस्सल मराठी चवीची सांडग्यांची झणझणीत आमटी, टेस्ट अशी की तोंडाला चवच येईल

Sandgyachi Amti - Marathi Recipe, Authentic taste you will loved it सांडग्याची भाजी, आमटी हा पारंपरिक पदार्थ, उन्हाळ्यात भाजीचा तुटवडा तेव्हा तर ही आमटी केलीच जाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 03:35 PM2023-04-25T15:35:19+5:302023-04-25T15:36:18+5:30

Sandgyachi Amti - Marathi Recipe, Authentic taste you will loved it सांडग्याची भाजी, आमटी हा पारंपरिक पदार्थ, उन्हाळ्यात भाजीचा तुटवडा तेव्हा तर ही आमटी केलीच जाते.

Sandgyachi Amti - Marathi Recipe, Authentic taste you will loved it | करा अस्सल मराठी चवीची सांडग्यांची झणझणीत आमटी, टेस्ट अशी की तोंडाला चवच येईल

करा अस्सल मराठी चवीची सांडग्यांची झणझणीत आमटी, टेस्ट अशी की तोंडाला चवच येईल

महाराष्ट्रात सांडग्याची भाजी व आमटी फार फेमस आहे. उन्हाळ्यात महिलावर्ग सांडगे करतात. कधी घरात भाजी नसली की, गृहिणी सांडग्यांच्या भाजीचा बेत आखतात. सांडगे मिश्र डाळींपासून तयार करण्यात येते. जी आपल्या आरोग्यासाठी पौष्टीक मानली जाते. मिश्र डाळींमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात. ज्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

सांडग्याची भाजी गावाकडच्या भागात अधिक प्रमाणावर खाल्ली जाते. सांडगे साठवून ठेवल्यास वर्षभर टिकतात. सांडग्याची भाजी किंवा आमटी चपाती, भात भाकरीसह चविष्ट लागते. आजकाल बाजारात देखील सांडगे मिळतात. या चविष्ट सांडग्यांच्या आमटीची कृती पाहूयात(Sandgyachi Amti - Marathi Recipe, Authentic taste you will loved it).

सांडग्यांची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

सांडगे

तेल

जिरं

मोहरी

कांदा

हिंग

कडीपत्ता

तीन डाळींचे सांडगे करण्याची पाहा पारंपारिक पद्धत, करायला सोपे आणि पौष्टिक

लसणाच्या पाकळ्या

टोमॅटो

गोडा मसाला

लाल तिखट

शेंगदाण्याचं कूट

मीठ

झणझणीत सांडग्यांची आमटीची कृती

सर्वप्रथम, कुकरमध्ये तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप सांडगे घालून भाजून घ्या. सांडग्यांना सोनेरी रंग आल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवा. आता त्याच तेलात मोहरी, जिरं, पाव चमचा हिंग, कडीपत्ता, लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा घालून मिश्रण चांगले मिक्स करा. कांद्याला सोनेरी रंग आल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून ५ मिनिटांसाठी भाजून घ्या. टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यात गोडा मसाला, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट घालून मिश्रण भाजून घ्या. आपण शेंगदाण्याचं कूट टाकण्याऐवजी किसलेलं खोबरं देखील घालू शकता.

त्यात तळलेले सांडगे घालून मिश्रणात मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात गरम पाणी व चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आता पाच मिनिटं शिजू द्या, सांडगे लवकर शिजतात.

ताक म्हणजे उन्हाळ्यात अमृत, पण मीठ घालून ताकात पिताय का? कुणी टाळलेलंच बरं..

मिडीयम फ्लेमवर २ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा. कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडा. सांडग्याची आमटी एका बाऊलमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे सांडग्याची झणझणीत आमटी खाण्यासाठी रेडी. आपण ही रेसिपी चपाती, भाकरी किंवा भातासह खाऊ शकता.

Web Title: Sandgyachi Amti - Marathi Recipe, Authentic taste you will loved it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.