Lokmat Sakhi >Food > Sankashti Chaturthi 2021: झटपट तयार होणारं खमंग उपवासाचं थालिपीठ; नक्की ट्राय करा, एकदा खाल तर खातच राहाल

Sankashti Chaturthi 2021: झटपट तयार होणारं खमंग उपवासाचं थालिपीठ; नक्की ट्राय करा, एकदा खाल तर खातच राहाल

Sankashti Chaturthi 2021 : . हा पदार्थ तुम्ही रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर उपवास नसेल तरी, खाऊ शकता. आज संकष्टी चतुर्थीनिमित्त हे थालिपीठ नक्की ट्राय करून पाहा. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 11:45 AM2021-08-25T11:45:58+5:302021-08-25T12:51:55+5:30

Sankashti Chaturthi 2021 : . हा पदार्थ तुम्ही रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर उपवास नसेल तरी, खाऊ शकता. आज संकष्टी चतुर्थीनिमित्त हे थालिपीठ नक्की ट्राय करून पाहा. 

Sankashti Chaturthi 2021 : Upvas recipes Sankashti Chaturthi instant fasting Thalipith recipe | Sankashti Chaturthi 2021: झटपट तयार होणारं खमंग उपवासाचं थालिपीठ; नक्की ट्राय करा, एकदा खाल तर खातच राहाल

Sankashti Chaturthi 2021: झटपट तयार होणारं खमंग उपवासाचं थालिपीठ; नक्की ट्राय करा, एकदा खाल तर खातच राहाल

उपवासाच्या दिवशी नेहमी काय नवीन बनवायचं असा प्रश्न सगळ्याच गृहिणींसमोर असतो. नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी, वरीचे तांदूळ खाऊन घरातील मंडळींना कंटाळा येतो. सोपं आणि कमी वेळात होणारा पदार्थ म्हणून आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो. साबुदाणा  आणि बटाटा वापरून तुम्ही खास थालिपीठ बनवू शकता. उपवासाच्या दिवशी चव बदल म्हणून हा एक उत्तम पदार्थ आहे. हा पदार्थ तुम्ही रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर उपवास नसेल तरी, खाऊ शकता. आज संकष्टी चतुर्थीनिमित्त हे थालिपीठ नक्की ट्राय करून पाहा. 

साहित्य

२ वाट्या साबुदाणा, 

२ मध्यम बटाटे (शिजवलेले), 

१/२ वाटी शेंगदाण्यांचा कूट,

५-६ हिरव्या मिरच्या, 

अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, 

१ चमचा लिंबाचा रस, 

१ चमचा जीरे, 

१/२ चमचा जीरेपूड,

चवीपुरते मिठ,

तेल/ तूप, थालिपीठ थापण्यासाठी प्लास्टीकची शिट

कृती

साबुदाणे पाण्यात भिजवावे. उरलेले पाणी काढून टाकावे. ३-४ तास भिजत ठेवावेत.शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात. भिजवलेला साबुदाणा, शिजवलेले बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, जीरेपूड, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे. प्लास्टीक शिटला तूपाचा हात लावून गोळे थापावे.

थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे. नॉनस्टीक तव्यावर थोडे तूप सोडावे. मिडीयम हाय हिटवर थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे. दही, मिरचीचा ठेचा, किंवा लिंबाचे गोड लोणचे यांबरोबर हे थालिपीठ छान लागते.

Web Title: Sankashti Chaturthi 2021 : Upvas recipes Sankashti Chaturthi instant fasting Thalipith recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.