Lokmat Sakhi >Food > संकष्टी चतुर्थी स्पेशल: उपवासाच्या फराळात करा गुळ घालून बट्याट्याचा खास हलवा! झटकेपट..

संकष्टी चतुर्थी स्पेशल: उपवासाच्या फराळात करा गुळ घालून बट्याट्याचा खास हलवा! झटकेपट..

Sankashti Chaturthi Special : उपवासाला बटाटा अनेकांना प्रिय, त्याचाच हा छान सोपा गोड पदार्थ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 06:06 PM2021-11-22T18:06:41+5:302021-11-23T13:10:15+5:30

Sankashti Chaturthi Special : उपवासाला बटाटा अनेकांना प्रिय, त्याचाच हा छान सोपा गोड पदार्थ.

Sankashti Chaturthi Special: how to make potato halwa, potato jaggery and potato halwa- batatyacha halwa | संकष्टी चतुर्थी स्पेशल: उपवासाच्या फराळात करा गुळ घालून बट्याट्याचा खास हलवा! झटकेपट..

संकष्टी चतुर्थी स्पेशल: उपवासाच्या फराळात करा गुळ घालून बट्याट्याचा खास हलवा! झटकेपट..

Highlightsउपवासाचे ताट सजवण्यासाठी उपयुक्त असा हा सोपा पदार्थ. झटपट होणारा.

प्रतिभा जामदार

बटाट्याचा हलवा. हा पदार्थ करायला सोपा आहे. अगदी झटपट हा हलवा बनतो. उपवासाला आपण बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ खातोच. काहीतरी गोड हवं असंही वाटतं. तर उपवासासाठी हा खास बटाट्याचा हलवा करुन पहा. (Sankashti Chaturthi Special)


साहित्य- ३ मध्यम आकाराचे बटाटे उकडून, किसून. अर्धी वाटी गूळ, ४ ते ५ चमचे साजूक तूप, १ चमचा वेलदोडा पूस, २ चमचे ड्रायफ्रूट किसलेले सजावटीसाठी.

(Image : Google)

कृती- पॅन मध्ये 4 चमचे तूपात मंद गॅसवर बटाट्याचा किस परतवून घेणे. ७ ते ८ मिनिटे परतवून झाल्यावर बाजूने थोडे तूप सुटेल. नंतर त्यात गुळ घालून परतावे. गूळ विरघळून मिश्रण पातळ होईल. मंद गॅसवर सतत परतवून ते आटवून घ्यावे. त्यात वेलदोडा पूड घालून हलवा मिक्स करावा. गरज असेल तर वरून थोडे तूप घालून परत मिक्स करावे. ड्रायफ्रूट ने सजवावे.


हा हलवा फार झटपट तर होतोच पण उपवासाच्या थाळीमध्ये गोडाचा पदार्थ म्हणून पक्के स्थान पटकावतो.
आज संकष्टी चतुर्थी आज हा बटाट्याचा हलवा करुन पहा, उपवासाला उत्तम. आणि उपवास नाही त्यांनाही आवडेल.

(प्रतिभा जामदार यांच्या अशाच उत्तम पाककृती संध्याई किचन या त्यांच्या युट्यूब चॅनलवरही पाहता येतील.)


 

Web Title: Sankashti Chaturthi Special: how to make potato halwa, potato jaggery and potato halwa- batatyacha halwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.