Lokmat Sakhi >Food > संकष्टी चतुर्थी स्पेशल :  बिन साखरेचे ड्राय फ्रुट्स मोदक आणि साबुदाण्याचे सोपे मोदक; करा प्रसादाला पटकन!

संकष्टी चतुर्थी स्पेशल :  बिन साखरेचे ड्राय फ्रुट्स मोदक आणि साबुदाण्याचे सोपे मोदक; करा प्रसादाला पटकन!

संकष्टी चतुर्थी स्पेशल : उकडीचे आणि तळणीचे मोदक तर नेहमीचे, हे अगदी सोपे, पटकन होणारे सुक्यामेव्याचे आणि साबुदाण्याचे मोदक करुन पहा. (sankashti chaturthi special)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 06:53 PM2021-11-22T18:53:23+5:302021-11-22T18:58:29+5:30

संकष्टी चतुर्थी स्पेशल : उकडीचे आणि तळणीचे मोदक तर नेहमीचे, हे अगदी सोपे, पटकन होणारे सुक्यामेव्याचे आणि साबुदाण्याचे मोदक करुन पहा. (sankashti chaturthi special)

Sankashti Chaturthi Special: how to make sabudana and dry fruits modak. Dry Fruits Modak and Modak of Sago- sabudana. Make prasada quickly! | संकष्टी चतुर्थी स्पेशल :  बिन साखरेचे ड्राय फ्रुट्स मोदक आणि साबुदाण्याचे सोपे मोदक; करा प्रसादाला पटकन!

संकष्टी चतुर्थी स्पेशल :  बिन साखरेचे ड्राय फ्रुट्स मोदक आणि साबुदाण्याचे सोपे मोदक; करा प्रसादाला पटकन!

Highlightsगणपती बाप्पाला उत्तम प्रसाद आणि थंडीत छान पोषक पदार्थ. करुन पहा साबुदाणा मोदक आणि सुका मेवा मोदक.

प्रतिभा जामदार

आज संकष्टी चतुर्थी. मोदक तर तुम्ही करालच, पण नेहमीचे उकडीचे, तळणीचे मोदक करण्यासोबतच हे दोन खास वेगळ्या प्रकारचे मोदक. साबुदाणा मोदक आणि बिन साखरेचे सुक्या मेव्याचे मोदक. करायला सोपे. गणपती बाप्पाला उत्तम प्रसाद आणि थंडीत छान पोषक पदार्थ.
करुन पहा साबुदाणा मोदक आणि सुका मेवा मोदक. आणि हे मोदक सकाळी केले तरी चालतील, ते उपवासालाही चालतात. सुक्यामेव्याचे मोदक बिनसारखरेचे असल्यानं डायबिटीस असला तरी खाता येतील. (sankashti chaturthi special)

साबुदाणा मोदक

साहित्य


१ वाटी साबुदाणा
अर्धी वाटी साखर
अर्धी वाटी तूप (गरजेनुसार)
१ मोठा चमचा वेलदोडा पूड.
कृती- कढई मध्ये १ चमचा तूप घालून त्यावर साबुदाणा मंद गॅसवर गुलाबी होइपर्यंत भाजून घ्यावा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याचे बारीक पीठ करून घ्यावे. त्यामध्ये साखर दळून घालावी, वेलदोडा पूड घालून पीठ मिक्स करून घ्यावे. छोट्या कढई मध्ये तूप गरम करून ते पिठात घालावे. मोदक बांधण्याइतके पीठ मऊ झाले की मोदकाच्या साच्याला तुपाचे बोट लावून त्यात हे पीठ गच्च भरून मोदक तयार करावे. झाले तयार साबुदाणा मोदक.


बिना साखरेचे सुक्या मेव्याचे (ड्रायफ्रूट) मोदक

 

साहित्य
१ वाटी बिया काढून बारीक चिरलेला खजूर
पाव वाटी काजूचे तुकडे
पाव वाटी बदामाचे तुकडे
पाव वाटी पिस्त्यांचे तुकडे
पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस
१ चमचा खसखस
१ चमचा वेलदोडा पूड
साजूक तूप गरजेनुसार

कृती


एक पॅनमध्ये सुके खोबरे हलके भाजून घ्यावे. थंड करून मिक्सरमध्ये त्याची पूड करून घ्यावी. पॅन मध्ये १ चमचा तूप घालून त्यात खसखस आणि सगळे ड्रायफ्रूट घालून परतवून भाजून घ्यावेत आणि बाजूला ठेवावे. त्याच पॅनमध्ये २ चमचे तूप गरम करून त्यात खजुर घेऊन तो परतून घ्यावा. खजूर मऊ होईल. त्यामध्ये भाजून ठेवलेले सगळे पदार्थ, खोबरे, वेलदोडा पूड घालून मिक्स करावे. मिश्रण थंड झाल्यावर हाताने मळून घ्यावे, ते मऊ झाले पाहिजे. मोदकाच्या साच्याला तुपाचे बोट लावून हे मिश्रण त्यात गच्च दाबून भरावे आणि मोदक बनवावेत.
झाले मोदक तयार.
 

Web Title: Sankashti Chaturthi Special: how to make sabudana and dry fruits modak. Dry Fruits Modak and Modak of Sago- sabudana. Make prasada quickly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.