Lokmat Sakhi >Food > Sankashti Chaturthi Special : संकष्टी चतुर्थीला नेहमी तेच ते मोदक नको? करा उकडीचे आंबा फ्लेवर मोदक; सोपी रेसिपी...

Sankashti Chaturthi Special : संकष्टी चतुर्थीला नेहमी तेच ते मोदक नको? करा उकडीचे आंबा फ्लेवर मोदक; सोपी रेसिपी...

Sankashti Chaturthi Special Mango Modak Recipe : बाप्पा सोबतच घरातील मंडळीही होतील खूश, नेहमीच्याच रेसिपीमध्ये थोडासा ट्विस्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2023 05:53 PM2023-05-08T17:53:15+5:302023-05-08T17:54:46+5:30

Sankashti Chaturthi Special Mango Modak Recipe : बाप्पा सोबतच घरातील मंडळीही होतील खूश, नेहमीच्याच रेसिपीमध्ये थोडासा ट्विस्ट...

Sankashti Chaturthi Special Mango Modak Recipe : Don't want the same Modak on Sankashti Chaturthi? Mango Flavor Modak; Easy recipe... | Sankashti Chaturthi Special : संकष्टी चतुर्थीला नेहमी तेच ते मोदक नको? करा उकडीचे आंबा फ्लेवर मोदक; सोपी रेसिपी...

Sankashti Chaturthi Special : संकष्टी चतुर्थीला नेहमी तेच ते मोदक नको? करा उकडीचे आंबा फ्लेवर मोदक; सोपी रेसिपी...

संकष्टी चतुर्थी म्हटली की बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि उपवास सोडण्यासाठी मोदक आलेच. बरेचदा आपण गडबडीत तळणीचे किंवा नेहमीचे उकडीचे मोदक करतो. काही वेळा खव्याचे किंवा आणखी कोणते मोदकांचे प्रकारही ट्राय करतो. पण उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात फळांचा राजा आंबा असल्याने या आंब्याच्या फ्लेवरचे खास मोदक केले तर? हे आगळेवेगळे मोदक खाऊन बाप्पा तर खूश होईलच पण घरातील मंडळीही खूश होतील. आपण आंब्याच्या फ्लेवरचे मावा मोदक खातो. पण उकडीच्या मोदकांमध्ये आपण आंब्याचा फ्लेवक क्वचितच ट्राय केला असेल. नेहमीच्याच उकडीच्या मोदकांना थोडासा ट्विस्ट देऊन हे मोदक होत असल्याने त्यासाठी खूप वेगळं काहीतरी करावं लागतं असं काही नाही. मोदक हा अनेकांचा विक पॉईंट असून एरवी नाही तरी चतुर्थीच्या दिवशी बाप्पासाठी तरी आवर्जून ते केले जातातच. पाहूयात हे झटपट होणारे मँगो फ्लेवरचे छान पिवळे दिसणारे हे उकडीचे मोदक कसे करायचे (Sankashti Chaturthi Special Mango Modak Recipe). 

साहित्य -

१. तांदळाचे पीठ - २ वाट्या 

२. आंब्याचा रस - २ वाट्या 

३. केशर काड्या - ८ ते १० 

४. मीठ - अर्धा चमचा 

(Image : Google)
(Image : Google)

५. साजूक तूप - २ चमचे 

६. खोवलेला नारळ - २ वाट्या 

७. गूळ - १ वाटी 

८. खसखस - १ चमचा 

९. वेलची पूड - अर्धा चमचा 

कृती -

१. एका पातेल्यात साधारण १ ते २ कप पाणी घेऊन ते गरम करायला ठेवायचे. 

२. त्यामध्ये १ वाटी आंब्याचा रस आणि केशराच्या काड्या घालायच्या.

३. हे सगळे चांगले शिजवून घ्यायचे आणि उकळी आली की त्यामध्ये थोडे मीठ आणि तूप घालायचे. 

४. त्यानंतर यात तांदळाचे पीठ घालून मिश्रण चांगले ढवळून एकजीव करुन घ्यायचे.

५. उकड मुरण्यासाठी त्यावर झाकण ठेवायचे आणि गॅस बंद करायचा. 

६. दुसरीकडे सारणाची तयारी करण्यासाठी एका पॅनमध्ये तूप घेऊन त्यात १ वाटी गूळ घालायचा आणि थोडं पाणी घालून गूळ वितळून घ्यायचा. 

७. यामध्ये २ वाट्या खोवलेले पांढरे शुभ्र खोबरं घालायचे आणि ते परतून घ्यायचे.

८. यामध्ये १ वाटी आंब्याचा रस आणि वेलची पावडर आणि भाजलेली खसखस घालून हे मिश्रण चांगले घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचे. 

९. उकडीवरचे झाकण काढून मिश्रण एका परातीत काढायचे आणि सुरुवातीला एखाद्या डावाने आणि मग हाताने चांगले मळून घ्यायचे. 

१०. मळलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करुन मोदकासाठी पाऱ्या करायच्या आणि सारण भरुन मोदक उकडायला ठेवायचे. 

११. हे गरमागरम मोदक तूप घालून बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि उपवास सोडताना खायला घ्यायचे. 

 

 

Web Title: Sankashti Chaturthi Special Mango Modak Recipe : Don't want the same Modak on Sankashti Chaturthi? Mango Flavor Modak; Easy recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.