Lokmat Sakhi >Food > संकष्टी चतुर्थीच्या उपवासाला करा रताळ्याचा खमंग किस, आरोग्यासाठी अतिशय उत्तम- घ्या रेसिपी

संकष्टी चतुर्थीच्या उपवासाला करा रताळ्याचा खमंग किस, आरोग्यासाठी अतिशय उत्तम- घ्या रेसिपी

Sankashti Chaturthi Special Recipe: संकष्टी चतुर्थीच्या उपवासाच्या दिवशी रताळ्याचा पौष्टिक आणि चवदार किस करून पाहा..(ratalyacha kees recipe in Marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2025 16:03 IST2025-01-17T16:03:10+5:302025-01-17T16:03:57+5:30

Sankashti Chaturthi Special Recipe: संकष्टी चतुर्थीच्या उपवासाच्या दिवशी रताळ्याचा पौष्टिक आणि चवदार किस करून पाहा..(ratalyacha kees recipe in Marathi)

sankashti Chaturthi special recipe, how to make ratalyacha kees, ratalu sabji recipe for fast  | संकष्टी चतुर्थीच्या उपवासाला करा रताळ्याचा खमंग किस, आरोग्यासाठी अतिशय उत्तम- घ्या रेसिपी

संकष्टी चतुर्थीच्या उपवासाला करा रताळ्याचा खमंग किस, आरोग्यासाठी अतिशय उत्तम- घ्या रेसिपी

Highlightsरताळे खाल्ल्यानंतर पुढे बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठीही ते उपयुक्त ठरतात.

संकष्टी चतुर्थीचा उपवास अनेक जण करतात. बहुतेक ठिकाणी तर घरातले सगळेच हा उपवास करतात (Sankashti Chaturthi Special Recipe). त्यामुळे मग सगळ्यांच्या आवडीचा आणि शिवाय पौष्टिक असा मेन्यू करण्याकडे घरातल्या महिलांचा कल असतो. असाच उपवासाचा एक अतिशय पौष्टिक पदार्थ म्हणजे रताळ्याचा किस. रताळे खूप आरोग्यदायी असून त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे पचायला ते सोपे असतात. शिवाय रताळे खाल्ल्यानंतर पुढे बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठीही ते उपयुक्त ठरतात. म्हणूनच आता रताळ्याचा किस कसा करावा, त्याची ही रेसिपी एकदा पाहून घ्या..(ratalyacha kees recipe in Marathi)

रताळ्याचा किस करण्याची रेसिपी

 

साहित्य

३ ते ४ मध्यम आकाराचे रताळे

२ टेबलस्पून तूप

१ ते २ मिरच्यांचे काप

चवीनुसार मीठ आणि लाल तिखट

१ टेबलस्पून दाण्याचा कूट

चिमूटभर साखर

 

कृती

सगळ्यात आधी रताळे स्वच्छ धुवून घ्या आणि ते पुसून कोरडे करून  किसून घ्या.

केस एवढे वाढतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल; करून पाहा 'हा' उपाय- केस गळणं बंद होईल

आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाली की तिच्यामध्ये थोडे तूप घाला..

तूप गरम झाल्यानंतर मिरच्या टाकून परतून घ्या. ज्यांच्याकडे उपवासाला जिरे चालतात ते फोडणीमध्ये जिरेही घालू शकतात.

 

मिरच्या परतून झाल्यानंतर रताळ्याचा किस कढईमध्य घाला आणि व्यवस्थित परतून घ्या. त्याच वेळी चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घाला. आता कढईवर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या.

चमचाभर तांदूळ घेऊन करा 'हा' उपाय, त्वचेवर येईल सुंदर ग्लो; विकतचं क्रिम लावण्याची गरजच नाही

साधारण ५ ते ७ मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढा. थोडा दाण्याचा कूट आणि चिमूटभर साखर घालून पुन्हा एकदा सगळं हलवून घ्या आणि पुन्हा कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. यानंतर गरमागरम रताळ्याचा किस तयार. हा किस तुम्ही दह्यासोबत किंवा उपवासाच्या लिंबाच्या लोणच्यासोबत खाऊ शकता. 

 

Web Title: sankashti Chaturthi special recipe, how to make ratalyacha kees, ratalu sabji recipe for fast 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.