Lokmat Sakhi >Food > संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडताना बाप्पाला करा तळणीच्या मोदकांचा खुसखुशीत नैवेद्य; झटपट सोपी रेसिपी

संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडताना बाप्पाला करा तळणीच्या मोदकांचा खुसखुशीत नैवेद्य; झटपट सोपी रेसिपी

Sankashti Chaturthi Special Talniche Modak Recipe : हातात कमी वेळ असेल तर तळणीचे खुसखुशीत मोदक करुन बाप्पांना खूश करता येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2023 03:54 PM2023-09-03T15:54:57+5:302023-09-04T14:43:25+5:30

Sankashti Chaturthi Special Talniche Modak Recipe : हातात कमी वेळ असेल तर तळणीचे खुसखुशीत मोदक करुन बाप्पांना खूश करता येईल.

Sankashti Chaturthi Special Talniche Modak Recipe : When breaking the fast of Sankashti Chaturthi, make an offering of fried Modakas to Bappa; Get the quick easy recipe.. | संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडताना बाप्पाला करा तळणीच्या मोदकांचा खुसखुशीत नैवेद्य; झटपट सोपी रेसिपी

संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडताना बाप्पाला करा तळणीच्या मोदकांचा खुसखुशीत नैवेद्य; झटपट सोपी रेसिपी

गणपती बाप्पा म्हणजे अनेकांचे आराध्यदैवत. बाप्पावर मनापासून भक्ती असणारे आणि त्याची मनोभावे आराधना करणारे त्याचे भक्त चतुर्थी चुकवत नाहीत. बाप्पाने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण कराव्यात यासाठी बरेच जण अतिशय भक्तीभावाने चतुर्थीचा उपवास करतात. आजही संकष्टी चतुर्थी असून अनेकांचा आज उपवास आहे. श्रावण महिना त्यात चतुर्थी आणि गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आजच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी म्हटल्यावर बाप्पाला मोदकांचा नैवेद्य ओघानेच आला. चंद्रोदयाला बाप्पांची आरती करुन त्यांना मोदकांचा नैवेद्य दाखवत हा उपवास सोडण्याची पद्धत आहे. आज नैवेद्याला कोणते मोदक करायचे असा प्रश्न पडला असेल आणि हातात कमी वेळ असेल तर तळणीचे खुसखुशीत मोदक करुन बाप्पांना खूश करता येईल. झटपट होणारे आणि अतिशय सोपे असे हे मोदक कसे करायचे पाहूया (Sankashti Chaturthi Special Talniche Modak Recipe)...

साहित्य -

१. गव्हाचे पीठ - १ वाटी 

२. बारीक रवा - पाव वाटी 

३. तेलाचे मोहन - २ चमचे

४. सुक्या खोबऱ्याचा किस- पाऊण वाटी 

५. खसखस - २ चमचे 

६. पिठीसाखर - अर्धी वाटी 

(Image : Google)
(Image : Google)

७. नेवची पूड - अर्धा चमचा

८. बदाम, काजू , पिस्ता पावडर - अर्धी वाटी 

९. बेदाणे - पाव वाटी 

१०. तेल - २ वाट्या 

कृती - -

१. सगळ्यात आधी गव्हाचे पीठ, रवा आणि चवीपुरतं मीठ घालून घट्टसर कणीक भिजवून घ्यायची. हे पीठ भिजवताना यामध्ये तेल गरम करुन त्याचे मोहन घालावे म्हणजे मोदक खुसखुशीत होण्यास मदत होते.

२. एका पॅनमध्ये खोबरं आणि खसखस लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची. 

३. गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये सुकामेव्याची पूड आणि पिठीसाखर घालून सगळे चांगले एकजीव करावे.

४. शेवटी यात वेलची पूड आणि बेदाणे घालून सगळे चांगले हलवून एकजीव करावे. 

५. मळलेल्या पीठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात.

६. या पुऱ्यांमध्ये गार झालेले सारण भरुन त्याला छान पाकळ्या करुन मोदक बनवावा. 

७. दुसरीकडे कढईत तेल तापायला ठेवून ते गरम होत आले की मोदक यामध्ये गोल्डन ब्राऊन रंगावर छान खरपूस तळून घ्यावेत.

Web Title: Sankashti Chaturthi Special Talniche Modak Recipe : When breaking the fast of Sankashti Chaturthi, make an offering of fried Modakas to Bappa; Get the quick easy recipe..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.