Lokmat Sakhi >Food > संक्रांत स्पेशल : तीळ-गुळाचा गोड पराठा, गूळपोळीपेक्षा करायला सोपा - पौष्टिक पदार्थ

संक्रांत स्पेशल : तीळ-गुळाचा गोड पराठा, गूळपोळीपेक्षा करायला सोपा - पौष्टिक पदार्थ

Sesame Seed Jaggery Paratha मकर संक्रात म्हटलं की आपल्याला तिळाचे लाडू आणि तिळगुळ आठवतात. मात्र, आता तिळाचे पराठे करून पाहा, चव अशी जी करेल दिल खुश..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2023 06:30 PM2023-01-08T18:30:32+5:302023-01-09T14:51:58+5:30

Sesame Seed Jaggery Paratha मकर संक्रात म्हटलं की आपल्याला तिळाचे लाडू आणि तिळगुळ आठवतात. मात्र, आता तिळाचे पराठे करून पाहा, चव अशी जी करेल दिल खुश..

Sankrant Special : Sweet Sesame Jaggery Paratha, Easier to make than Gulpolli - Nutritious | संक्रांत स्पेशल : तीळ-गुळाचा गोड पराठा, गूळपोळीपेक्षा करायला सोपा - पौष्टिक पदार्थ

संक्रांत स्पेशल : तीळ-गुळाचा गोड पराठा, गूळपोळीपेक्षा करायला सोपा - पौष्टिक पदार्थ

"तिळगुळ घ्या गोड गोड बोला" म्हणत प्रत्येकाचे तोंड गोड करणारा हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाच्या दिवशी आपण अनेक गोड पदार्थ घरी बनवतो. मुख्यतः तिळाचे लाडू, चिक्की, तिळगुळ वाटून हा सण साजरा करण्यात येतो. या दिवसात तीळ खाल्ल्याने शरीराला पौष्टिक घटक मिळतात. तीळ आणि गुळाचा प्रभाव गरम असतो, त्यामुळे या पराठ्याचे सेवन केल्याने आपले शरीर उबदार राहते. यासह रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. ज्यामुळे आपण सर्दी, खोकला यांसारख्या हंगामी आजारांपासून स्वतःचे बचाव करू शकतात. तिळाचा पराठा चवीला गोड असतो. मकर संक्रांतीच्या सणाला हा चविष्ट पदार्थ बनवून दिवसाची सुरुवात करू शकता.

तीळाचे पराठे बनवण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचे पीठ - 1 वाटी

तीळ - १/२ वाटी (भाजलेले)

गूळ - १ वाटी

देशी तूप - ५० ग्रॅम

नारळ पावडर

कृती

तिळाचा पराठा बनवण्यासाठी सर्व प्रथम गव्हाचे पीठ परातीत चाळून घ्या. मग त्यात २ चिमूटभर मीठ आणि वितळलेला गूळ मिसळा. त्यानंतर तीळ आणि नारळ पावडर टाका. हे मिश्रण एकत्र मिक्स झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या.

यानंतर, हे पीठ सुमारे 15 मिनिटे सेट करण्यासाठी बाजूला झाकून ठेवा. दुसरीकडे एका पॅनला तूप लावून गरम करा. यानंतर पिठाचे गोळे करून पराठ्यासारखे लाटून घ्या.

नंतर गरम तव्यावर पराठा टाका. दोन्ही बाजूंनी तूप लावून मध्यम गॅसवर सोनेरी रंग येऊपर्यंत दोन्हीकडून भाजून घ्या. अशाप्रकारे झटपट, चविष्ट आणि आरोग्यदायी तिळाचा पराठा खाण्यासाठी तयार.

Web Title: Sankrant Special : Sweet Sesame Jaggery Paratha, Easier to make than Gulpolli - Nutritious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.