बऱ्याच मुलींना पीसीओडीचा त्रास असतो. तसेच स्थुलता जाता जात नाही.(Satvik Food Movement) पाळीचे विविध त्रास असतात. पण जर फक्त आहारात बदल करून तुम्ही अशा आजारांना पळवून लावू शकलात तर? आणि अनेकदा असं होतं की, आता कायम स्वरुपी एक औषध घ्यावं लागणार असं डॉक्टर सांगतात. असच एका डॉक्टरांनी सुबा सराफला देखील सांगितले होते.(Satvik Food Movement) सुबा सराफ म्हणजे सास्तिक मूव्हमेंटची को-फाऊंडर. सध्या भारतातून लाखांनी लोक तिचे व्हिडिओ बघून प्रेरित होतात.तिने दिलेले आरोग्यविषय सल्ले ऐकतात. तिची पुस्तके वाचतात. एका पॉडतिनेकास्टमध्ये सुबाने तिला सात्विक मूव्हमेंटची कल्पना कशी सुचली सांगितले. ते सांगताना आपण नक्की कुठे चुकतो काय सुधारायला हवे या विषयी सल्ला दिला.
सुबाने तिचा अनुभव सांगितला. वयाच्या १३व्या वर्षीच तिला क्रोनिकल आजार होण्यास सुरवात झाली होती. (Satvik Food Movement)जेव्हा ती १७ वर्षाची झाली तिला रोज ६ गोळ्या घ्याव्या लागत होत्या. थायरॉईड, पीसीओडी, स्थुलता आता आयुष्यभर असणारच आहे. असं तिला वाटत होतं.
पण नशीबाने तिची भेट एका शिक्षकाशी झाली. ते दावा करत होते की तुम्ही कुठलाही आजार बरा करु शकता, फक्त खाण्यापिण्याच्या सवयी बदला, सुधारा.(Satvik Food Movement) त्याचं ऐकून सुबाने स्वत:च्या सवयी बदलण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्यातच मला फरक जाणवला असे तिने सांगितले. आहारात बदल करा. सात्विक आहार घ्या. क्रोनिकल आजार निघून जातील.
सात्विक आहारासंदर्भात माहिती देत सुबा भारतभर फिरते. थायरॉईडचा त्रास पुन्हा आयुष्यात न झाल्याचा दावादेखील ती करते. सुबाने सांगितलेले नियम आणि खाण्याच्या सवयी देशभरातले लोक पाळत आहे. सुबा म्हणते जर आहार अयोग्य नसेल तर कितीही औषधोपचार करा. त्याचा उपयोग होणार नाही. पण आहार योग्य असेल तर औषधं विकत घेण्याची वेळच येणार नाही.