उन्हाळ्याच्या दिवसात सतत थंडगार काहीतरी पिण्याची इच्छा होत असते. सारखा घाम येतो. त्यामुळे मग घशाला कोरड पडते आणि थंडगार प्यावं वाटतं. बऱ्याचदा तर पोटातही आग उठल्यासारखं होतं. असा त्रास होत असेल तर उन्हाळ्यात बडिशेपाचं सरबत करून प्यायला हवं. कारण बडिशेप अतिशय पाचक असते शिवाय थंड असते. त्यामुळे हे सरबत पिणं उन्हाळ्यात गुणकारी असतं (how to make saunf ka sharbat?). यामुळे पोटातली काहिली शांत होण्यास मदत होते. त्यामुळे ही रेसिपी पाहा आणि हे बडिशेपाचं सरबत करून प्या... (saunf ka sharbat to cools the stomach in summer)
साहित्य
अर्ध कप बडिशेप
२ टी स्पून लिंबाचा रस
वजन भराभर कमी करण्यासाठी चिया सीड्स घ्या, 'असा' करा उपाय- महिनाभरातच चरबी उतरेल
१ टी स्पून काळे मीठ
चवीनुसार साखर आणि मीठ
८ ते १० बर्फाचे खडे
गरज वाटल्यास हिरवा फूड कलर
कृती
१. बडिशेपाचं सरबत करण्यासाठी सगळ्यात आधी बडिशेप स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर २ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा.
२.दोन तासांनंतर बडिशेप मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. त्याचवेळी त्यामध्ये साखर, काळे मीठ, लिंबाचा रस टाका. सगळ्या मिश्रणाची अगदी बारीक पेस्ट करून घ्या.
सोनाली बेंद्रे सांगते- आम्हा बहिणींपुढे आईने एकच अट ठेवली होती, कोणाशीही लग्न करा पण....
३. आता या मिश्रणात पाणी टाका आणि ते सगळं एखाद्या सुती कपड्याने गाळून घ्या. यानंतर कपड्यामध्ये जी बडिशेप राहील ती पुन्हा मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या. यामुळे बडिशेपाचा पूर्ण अर्क पाण्यात उतरेल.
४. नंतर या सरबतामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर फूड कलर टाका. नाही टाकला तरी चालेल. चवीनुसार थोडं मीठ आणि साखर टाका. आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
५. आता हे सरबत ग्लासमध्ये टाका. त्यात बर्फाचे तुकडे टाकून सर्व्ह करा.. थंडगार, चवदार बर्फाचे सरबत तयार.