Join us  

Sawan Somwar 2022 : श्रावणी सोमवाराच्या उपवासाला काय खायचं काय टाळायचं? मन, शरीरालाही व्हायला हवा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 5:18 PM

Sawan Somwar 2022 fasting rules : उपवासाला जास्त तळलेले पदार्थ खाऊ नयेत. यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढेल. प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह सर्व आवश्यक पोषक घटक खा.

उपवास करणं केवळ धार्मिकदृष्याच नव्हे तर शरीरासाठीही चांगले मानले जाते. उपवासामुळे शरीराची पचनक्रिया अधिक चांगली होते आणि चयापचय गती वाढते. मात्र, या काळात काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो. श्रावण महिन्यात भगवान शंकराचा दिवस मानल्या जाणाऱ्या सोमवारचे व्रत आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. (Shravan vrat rules) जर तुम्ही श्रावण सोमवारचे उपवास करणार असाल तर उपवासाच्या वेळी कसे निरोगी राहायचे ते सांगणार आहोत. (Sawan Somwar 2022 fasting rules)

तुम्ही उपवास किती काटेकोरपणे पाळू शकता हे त्या व्यक्तीच्या विश्वासावर तसेच त्याच्या आरोग्यावर अवलंबून असते. काही लोक दिवसभर उपाशी राहतात आणि फक्त संध्याकाळी हलकी फळे खातात, तर काही लोक उपवासात सामान्य अन्न खाण्याऐवजी फळे, दूध आणि इतर उपवासाचे पदार्थ खातात, तर काही लोक दिवसभर उपाशी राहतात. ते रात्री फक्त एकदाच जेवतात आणि ते ही मीठाशिवाय.  आपल्या आरोग्याचा विचार करून उपवासाची पद्धत निवडावी. (Shravan Somvar Vrat)

उपवास करताना या गोष्टींची काळजी घ्या (Things to do during Shravan Maas)

१) उपवासात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. दररोज 6-8 ग्लास पाणी प्या.

२) अशा फळांचा आहारात समावेश करा, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल, जसे की द्राक्षे, लिची, संत्री, मोसमी इ.

३) रिकाम्या पोटी अ‍ॅसिडिटी वाढू शकते, त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने काही फळे खात राहा.

४) तुम्ही सुका मेवा खाऊ शकता, यामुळे आवश्यक ऊर्जा मिळेल आणि अशक्तपणा जाणवणार नाही.

५) न्याहारीसाठी, तुम्ही  दुधासह फळे घेऊ शकता किंवा दुधात भिजवलेले बदाम खाऊ शकता.

६) दुपारच्या जेवणात साबुदाणाच्या कोणत्याही पदार्थासह  दही घेऊ शकता किंवा तुम्ही शिंगाड्याचे पीठ आणि बटाट्यापासून बनवलेल्या पुरीबरोबर दही घेऊ शकता. 

७) उपवासाच्या दिवशी सकाळी तुम्ही दूध पिऊ शकता, दुधापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ खाऊ शकता.

८) संध्याकाळी साध्या चहासोबत उपवासाचे चिप्स, भाजलेले मखाने किंवा ड्राय फ्रुट्स खाऊ  शकता.

या गोष्टी टाळा

१) उपवासाला जास्त तळलेले पदार्थ खाऊ नयेत. यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढेल. प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह सर्व आवश्यक पोषक घटक खा.

२) शिंगाड्याचे पीठ आणि बटाटे जास्त प्रमाणात खाऊ नयेत.

३) उपवासादरम्यान सुस्ती टाळण्यासाठी पनीर आणि फुल क्रीम दूध टाळा. ताज्या फळांचा रस घ्या. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.श्रावण स्पेशलकिचन टिप्स