दिवाळीच्या (Diwali 2024) फराळात कितीही वेगवेगळे पदार्थ असले तरीही चकली शिवाय फराळ अपूर्णच आहे. दिवाळीचा फराळ म्हटलं की, सगळ्यांनाचं सर्वातआधी चकलीची आठवण येते. खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत चकली खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. कुरकुरीत चकली खायला प्रत्येकाला आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण फराळाच्या ताटातली चकली आधी फस्त करतात. पारंपरिक पद्धतीची चकली करायची म्हटलं की भाजणी तयार करून त्याची चकली केली जाते(Schezwan Chakli Recipe).
पण बदलत्या काळानुसार, आता चकलीचे देखील अनेक फ्लेवर्स सध्या बाजारांत अगदी सहज उपलब्ध असतात. यात बटर चकली, चीझ चकली, पालक चकली, गार्लिक चकली अशा असंख्य चवीच्या चकल्या मिळतात. यातीलच एक सगळ्यांत फेमस चकलीचा प्रकार म्हणजे शेजवान चिली चकली. शक्यतो चायनीज पदार्थांसोबत खाल्ली जाणारी ही लालचुटुक, झणझणीत तिखट चवीची चटणी आपण ताव मारून खातो. मग हीच शेजवान चटणी वापरून आपण नेहमीच्याच चटणीला हटके ट्विस्ट देत झटपट तयार होणारी इंस्टंट शेजवान चिली चकली करु शकतो. यंदाच्या दिवाळीला तसेच इतरवेळी टी टाईम स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी शेजवान चिली चकली घरच्या घरीच तयार करु शकतो, त्याचीच ही रेसिपी(How To Make Schezwan Chakli At Home For Diwali).
साहित्य :-
१. पाणी - २ कप २. बटर - २ टेबलस्पून ३. शेजवान चटणी - ८ टेबलस्पून ४. लाल मिरची पावडर - ४ टेबलस्पून ५. मीठ - चवीनुसार ६. बारीक रवा - १ कप ७. तांदुळाचे पीठ - १ + १/२ कप ८. तेल - तळण्यासाठी
ना भाजणीची धावपळ, ना तेलात चकली विरघळण्याचं टेंशन, १० मिनिटांत करा इन्स्टंट बटर चकली...
Diwali : यंदा दिवाळीत करा रतलामी शेव, घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी - फराळाची वाढेल लज्जत...
कृती :-
१. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्याला एक उकळी काढून घ्यावी. उकळी आल्यानंतर या पाण्यात बटर, शेजवान चटणी, लाल मिरची पावडर, बारीक रवा, मीठ घालावे. २. आता हे मिश्रण मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावे. मिश्रण शिजवून झाल्यानंतर ते एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. ३. बाऊलमध्ये काढून घेतलेल्या या मिश्रणात तांदुळाचे पीठ घालून ते व्यवस्थित एकत्रित करून पुन्हा एकदा पीठ मळून घ्यावे.
लाडू असो की वड्या, पाक हमखास चुकतो? ५ चुका टाळा-पाक कधीच बिघडणार नाही...
४. मळून घेतलेल्या पिठाचा गोळा साच्यात भरून चकल्या पाडून घ्याव्यात. ५. कढईत तेल घेऊन ते गरम करून घ्यावे. या गरम तेलात चकल्या सोडून मंद आचेवर चकल्या खरपूस तळून घ्याव्यात.
शेजवान चिली चकली खाण्यासाठी तयार आहे.