Lokmat Sakhi >Food > ताज्या लुसलुशीत मटारचा सीझन, करा चटपटीत मटार  रायते! हिवाळ्याचं चविष्ट सेलिब्रेशन 

ताज्या लुसलुशीत मटारचा सीझन, करा चटपटीत मटार  रायते! हिवाळ्याचं चविष्ट सेलिब्रेशन 

ताज्या मटारचा सिझनमधे मटारचे साध्या पासून खमंगपर्यंत सर्व पदार्थ केले जातात. एक चटपटीत पदार्थ मात्र करायचा राहतोच. मटारचे रायते... कसे करायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 07:34 PM2021-12-29T19:34:34+5:302021-12-29T19:36:21+5:30

ताज्या मटारचा सिझनमधे मटारचे साध्या पासून खमंगपर्यंत सर्व पदार्थ केले जातात. एक चटपटीत पदार्थ मात्र करायचा राहतोच. मटारचे रायते... कसे करायचे?

Season of freshly green peas, make spicy green peas raita for delicious celebration of winter | ताज्या लुसलुशीत मटारचा सीझन, करा चटपटीत मटार  रायते! हिवाळ्याचं चविष्ट सेलिब्रेशन 

ताज्या लुसलुशीत मटारचा सीझन, करा चटपटीत मटार  रायते! हिवाळ्याचं चविष्ट सेलिब्रेशन 

Highlightsमटार रायत्यासाठी दाणे कोवळे हवेत.रायत्यासाठी मटार पाण्यात उकळणं गरजेचे असतात. 

घरात ताजे मटार असले की कशातही घालून भाजी स्पेशल होते. मटारामुळे भाजी देखणी तर होतेच पण चविष्टही होते. खावीशी वाटते. न आवडत्या भाजीत मटार टाकलेले असल्यास ती भाजी आवडीने खाल्ली जाते. ताज्या मटारच्या या सिझनमधे मटारच्या विविध पाककृती केल्या जातात. पण एक चटपटीत पाककृती मात्र करायची राहून जाते. कारण ती माहितीच नसते.

चटपटीत स्वरुपात मटार खायचे असल्यास मटार रायता करावा.मटार रायता हा सकाळच्या जेवणात किवा रात्रीच्या जेवणात कधी केला तरी चालतो. उलट जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी अधून मधून मटार रायता करायलाच हवा.

Image: Google

कसा करणार मटार रायता?

मटार रायता करण्यासाठी दोन कप दही, 1 कप उकडलेले मटार, पाव चमचा जिरे भाजून त्याची तयार केलेली पूड, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा लाल तिखट, थोडा चाट मसाला आणि चवीप्रमाणे साधं मीठ घ्यावं. मटार रायता तयार करताना आधी कपभर मटार पाण्यात उकळून मऊ करुन घ्यावेत.

एका भांड्यात 2 कप दही घ्यावं. ते चांगलं फेटावं. मग उकडलेले मटार ओबडधोबड ठेचून् घ्यावेत. दह्यात वाटलेले मटार टाकावेत. ते चांगले मिसळून घ्यावेत. नंतर यात साधं मीठ, काळं मीठ, चाट मसाला, तिखट, जिरे पूड घालावी. सर्व जिन्नस छान एकत्र करावं .

Image: Google

मटार रायता आणखी चविष्ट करायचा असल्यास रायत्याला फोडणी द्यावी. यासाठी छोट्या कढईत थोडं तेल घ्यावं. ते गरम झालं की मोहरी घालावी. ती तडतडली की थोडे जिरे घालावेत. चिमूटभर हिंग, एखादी चिरलेली हिरवी मिरची आणि थोडा कढीपत्ता घालावा. ही चुरचुरीत फोडणी तयार मटार रायत्यावर घालून रायता चांगला फेटून घ्यावा. मसाले भात, साधा भात, खिचडी किंवा पराठे, दशम्या यासोबत छान लागतो.

Web Title: Season of freshly green peas, make spicy green peas raita for delicious celebration of winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.